Dussehra 2023: दसऱ्यादिवशी नशीबवान लोकांनाच या पक्षाचं होतं दर्शन...

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते.
neelkanth bird
neelkanth bird sakal
Updated on

हिंदू धर्मात अनेक सणांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यापैकी मोठा सण म्हणजेच दसरा. याच दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला होता. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाची पूजा केली जाते. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात.

या दिवशी देशभरात ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे शुभ मानले जाते. या पक्ष्याला भगवान शंकराचे रूप मानले जाते.

सर्व त्रास दूर होतात

विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. याशिवाय मनुष्याची सर्व दुःखही दूर होतात.

धार्मिक शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहिल्यास सौभाग्य प्राप्त होते. नीलकंठ पक्षी क्वचितच दिसत असले तरी. मात्र दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसला तर तुमचे चांगले दिवस सुरू होतील.

neelkanth bird
Vijaya Dashami 2023 : २३ की २४ ऑक्टोबर  कधी आहे दसरा? रावण दहनाचा शुभ मुहूर्त कोणता?

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे शुभ मानले जाते. नीलकंठ हे शिवाचे प्रतीक मानले जाते. पुराणानुसार, रामाने जेव्हा रावनाचा वध केला तेव्हा त्याला ब्राम्हण हत्येचे पातक लागले, यावेळी शंकराची रामाने पूजा केली, तेव्हा शंकर निलकंठाच्या रुपात प्रकट झाले होते, असे पौराणिक कथांमध्ये म्हटले आहे. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे शुभ मानले जाते.

नीलकंठ पक्षी दिसल्यास या गोष्टी करा

दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसल्यास (कृत्वा नीराजनं राजा बालवृद्धयं यता बलम्। शोभनम खंजनं पश्येज्जलगोगोष्ठसंनिघौ।। नीलग्रीव शुभग्रीव सर्वकामफलप्रद। पृथ्वियामवतीर्णोसि खच्चरीट नमोस्तुते।।) मंत्राचा जप करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()