Dussehra 2023 : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर करा 'ही' कामे; होईल भरपूर फायदा

शौर्य आणि विजयाचे प्रतिक म्हणून विजयादशमीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो.
Dussehra 2023
Dussehra 2023esakal
Updated on

Dussehra 2023 : नवरात्रौत्सवात ९ दिवस देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आहे. या विजयादशमीला आपण दसरा असे ही म्हणतो. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण असल्यामुळे याचे खास महत्व आहे.

शौर्य आणि विजयाचे प्रतिक म्हणून विजयादशमीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने (ज्याला आपण सोनं म्हणतो) ती पाने आज आपण एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो.

आजच्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला होता. हा विजय मिळवत श्रीरामांनी त्यांची अर्धांगिनी सितेची रावणाच्या बंदिवासातून सुटका केली होती.

तसेच, आजच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर या असूराचा वध केला होता, त्यामुळे, आजचा दिवस हा शौर्य आणि विजयाचे प्रतिक मानला जातो. दसऱ्याचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे, आजच्या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात. कोणती आहेत ती शुभ कार्ये जी आज केली जातात ? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Dussehra 2023
Navratri 2023 : महानवमी निमित्त कन्यापूजन करताय? मग जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

विजयादशमीच्या मुहूर्तावर ही खालील शुभ कामे केली जातात

  • दसऱ्याचा शुभ मुहूर्त आज दुपारी 12.15 ते 2 या वेळेत आहे.

  • या मुहूर्तावर भगवान श्रीराम आणि सरस्वतीची पूजा करावी.

  • यासोबतच, शस्त्रांची आणि वाहनांची विशेष पूजा करावी. त्यासोबतच, घोड्यांची ही पूजा करावी.

  • दसऱ्याला शमी पूजन आवर्जून करावे.

  • विजयादशमीच्या सायंकाळी नीलकंठ हा पक्षी पाहणे शुभ मानले जाते.

  • दसऱ्याच्या मुहूर्तामध्ये लग्नाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची शुभ कार्ये केली जाऊ शकतात.

  • त्यामुळे, आजच्या दिवशी मालमत्ता, वाहन, फ्लॅट, घर, इमारत, कोणतीही वास्तू, कार्यालय, व्यवसाय आणि प्रवास इत्यादी गोष्टींच्या खरेदी-विक्री करणे शुभ मानले जाते.

  • कोणत्याही व्यवसायाची सुरूवात करणे आज शुभ मानले जाते.

  • दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आजच्या दिवशी अनेक जण सोन्याची आवर्जून खरेदी करतात.

Dussehra 2023
Dussehra 2023 : दसऱ्याला शस्त्रांची पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.