Vastu Tips : घरात 'हे' किटक दिसणे असते शुभ

पावसाळ्यात किडे-किटक जमिनीतून बाहेर येतात. यात गोम हा असा किटक आहे जो दिसणे शुभ आणि अशुभ होऊ शकतो.
Vastu Tips
Vastu Tipsesakal
Updated on

पावसाळ्यात किडे-किटक जास्त दिसू लागतात. या काळात त्यांची पैदास वाढलेली असते. अशात गोम हा शंभर पायांचा किटक ज्याला शतपद पण म्हटले जाते. जिथे दमटपणा असतो तिथे गोम अधिक आढळतात. सामान्यपणे लोक गोम ला बघून घबरतात. काही लोक गोम दिसताच तिला मारतात. पण तुम्हाला माहिती आहे का, गोम शुभ आणि अशूभ अशा दोन्ही प्रकारचे फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार गोम राहूचे प्रतिक मानले जाते त्यामुळे याचे चांगले वाईट फळ असू शकते.

Vastu Tips
हा आहे जगातील सर्वात 'स्मार्ट किटक'; उचलू शकतो स्वतःच्या वजनापेक्षा तब्बल ५०० पट वजन; वाचाल तर व्हाल थक्क 

देवघरात गोम आढळली तर,

गोम जर देवघराजवळ आढळली तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. तर बाथरुम किंवा पायऱ्यांवर गोम आढळल्यास हा कमकुवत राहूचे लक्षण आहे.

Vastu Tips
शाब्बास... सातारकरांनी शोधला दुर्मिळ किटक

जमिनीवर जिवंत आढळल्यास,

घराच्या फरशीवर जिवंत गोम आढळल्यास हा संकेत घरासाठी अशूभ मानला जातो. यामुळे घराच्या वास्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे फरशीवर गोम दिसली तर तिला बाहेर काढा.

Vastu Tips
ऑस्ट्रेलियात एक हजार पायांची गोम

मेलेली गोम आढळली तर,

घराच्या फरशीवर मेलेली गोम दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असतो की, घरावर याणारी मोठी आपत्ती टळली आहे.

Vastu Tips
कुठे जेवणात आढळते अळ्या तर कुठे गोम; वाचा विलगीकरणातील संतापजनक प्रकार...

गोम मारू नये

बऱ्याचदा लोक घबरून गोमला मारून टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमच्या राहू ग्रहावर परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे चुकूनही गोम मारू नका.

Vastu Tips
Shukra Gochar: मिथुन राशीत शुक्र ग्रह करणार गोचर, 'या' चार राशींना मोठा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.