Ganesh Utsav: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणपती सुख चैतन्य आणि समृद्धी घेऊन येत असतो. यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्थीला संपेल. या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
गणेश चतुर्थी महत्त्वाचे मुहूर्त:
मध्याह्न गणेश पूजा मुहूर्त: सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिटचतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटचतुर्थी तिथी समाप्ती : १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिटआदल्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ: १८ सप्टेंबर, दुपारी १२ वाजून ३९ मिनिट ते रात्री ८ वाजून ३५ मिनिटगणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट या वेळेत तुम्ही श्री गणेशजीची मूर्ती स्थापन करू शकता.
पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.