Ekdant Ganesh Story : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘गणेश चतुर्थी’चा (Ganesh Chaturthi 2023) सण देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते.
गणपती बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, दुःखहर्ता, एकदंत, सुखकर्ता यासह कित्येक नावांनी संबोधले जाते. पण तुम्हाला बाप्पाच्या ‘एकदंत’ नावामागील कहाणी माहीत आहे का? गणपती बाप्पा म्हणजे विद्या, कला, बुद्धीची देवता.
भक्तगण या एकदंतापासून प्रेरणा घेऊन त्याची मनोभाव पूजा करतात. बाप्पाचा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जातो, त्यांच्या प्रत्येक नामामागे निरनिराळ्या कथा देखील ऐकायला मिळतात. एकदंत नावामागीलही कहाणी रोचक अशीच आहे.
गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळे मिळाल्याचे म्हटलं जाते. गणेश पुराणातील कथेनुसार, कार्तवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले होते.
त्यावेळेस भोलेनाथ ध्यानधारणा करत होते. पण श्री गणेशांनी परशुरामास महादेवाची भेट घेण्यापासून रोखले. दुसरीकडे परशुरामानेही महादेवाची भेट घेतल्याशिवाय येथून जाणार नाही, असे सांगितलं. तरीही विनम्रपणे गणपती बाप्पा परशुरामास महादेवाची भेट न घेण्यास सांगत होते. पण यानंतर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले आणि हा वाद इतका विकोपाला गेलं दोघांमध्ये युद्धच घडले.
श्री गणेश आणि परशुरामामध्ये मोठे युद्ध घडले. परशुरामाचा प्रत्येक प्रहार गणपती बाप्पासमोर निष्फळ ठरत गेला. शेवटी क्रोध अनावर झाल्यानं परशुरामाने गणेशावर भगवान शंकराकडून मिळालेल्या परशुने वार केला.
शिवशंकराकडून परशुरामास मिळालेल्या परशुचा बाप्पाने आदर ठेवला. पण या घटनेत गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून गणपती बाप्पा एकदंत या नावानेही ओळखले जाऊ लागले.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.