Ganesh Festival 2023 : श्री गणेशास २१ दूर्वाच का अर्पण करायच्या? जाणून घ्या रहस्य

आज आपण २१ अंक गणेशास इतका प्रिय का आहे? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023 esakal
Updated on

Ganesh Festival 2023 : गणेशाला २१ दूर्वाच का अर्पण करायच्या? किंवा गणेशाला २१ मोदकाचाच नैवेद्य का दाखवतात? असा प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडला असेलच. आज आपण २१ अंक गणेशास इतका प्रिय का आहे? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

सर्वप्रथम दूर्वा शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ. दूर्वा शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ बघितल्यास 'दुर्वति रोगान् अनिष्टं वा इति दुर्वा' अर्थात् रोगांचे व दुःखांचे जी निर्मूलन करते ती दूर्वा होय.

Ganesh Festival 2023
Ganeshotsav 2023: भडके कुटुंबाच्या आरासमध्ये ओझरच्या समस्या; घरगुती गणरायाची पंचक्रोशीत चर्चा

आता या दूर्वा २१ संख्येतच गणेशास का व्हायच्या? याचे कारण असे की मनुष्यदेह हा पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेन्द्रिये, षड्रिपू, तीन गुण, मन व अहंकार या २१ तत्त्वांनी युक्त आहे. २१ दूर्वा अर्पण करण्यामागील रहस्य असे की, या २१ तत्त्वांनी बनलेला मनुष्यदेह मोरयाच्या चरणी अर्पण करणे, अर्थात श्री गणेशाप्रती संपूर्ण शरणागत भाव असणे असे मानले जाते. (Ganesh Chaturthi Festival)

Ganesh Festival 2023
Ganeshotsav Special : गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक मोदक..! कलसाडी येथे शिक्षिकेच्या उपक्रमाचे कौतुक

मनुष्याला जी दुःख प्राप्त होत असतात ती प्रामुख्याने या २१ तत्त्वरूपी मायेत अडकल्यामुळे होत असतात. रूपक असलेल्या २१ दूर्वा गणेश चरणी अर्पण केल्यास दुःख व संकटे कशी प्राप्त होतील ? म्हणूनच मोरयाला २१ दूर्वा अर्पण करतात तसेच २१ संख्येतच मोदकांचा नैवेद्य दाखवायची परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.