ज्येष्ठा गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे,त्यामुळे ज्येष्ठा गौरीच्या या तिन दिवसात स्वतः पार्वती माता माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. भाद्रपदाची चाहूल लागताच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. यंदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 31 ऑगस्टला गणराज भक्तांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह ज्येष्ठा गौरीचे सुद्धा आगमन होते. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते.
गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरी जास्तीत जास्त देखण्या सुरेख कशा दिसतील यासाठी महिलांची खूप गडबड सुरू असते. गौरी-गणपती आल्यावर आपण डेकोरेशन, प्रसाद, पूजा या सगळ्याची तयारी करतो खरी. पण महिलांचे प्रश्न त्याहून वेगळे असतात. उभ्या गौरी असतील तर कमी जागेत त्या बसवायच्या, साडीचा पोत कोणताही असला तरी गौरींना छान चापून चोपून साडी नेसवायची हे एक प्रकारचे आव्हान असते.
माहेरवाशीण म्हणून आलेल्या या गौरी जास्तीत जास्त देखण्या कशा दिसतील यादृष्टीने महिलांचा प्रयत्न असतो. यासाठी साडी नेसवण्याच्या काही सोप्या टिप्स आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
● सगळ्यात आधी पदराच्या मिऱ्या घालून त्या सेट करुन ठेवाव्या. या सेट केलेल्या पदराला एखादी साईड पीन लावून ठेवल्यास तो पदर अजिबात हलणार नाही आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी नीट बसवता येईल.
● त्यानंतर गौरीच्या साडयामधील मिऱ्या हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. कारण मिऱ्याचा भाग पुढे येत असल्याने त्या छान आणि आकर्षक बसणे गरजेचे असते.
● नंतर गौरीच्या स्ँटडच्या उंचीप्रमाणे त्या अॅडजस्ट करायच्या असल्याने त्याचप्रमाणे मिऱ्या घालून घ्याव्या.संपूर्ण साडीच्या मिऱ्या घालून पहिल्या तीन मिऱ्या सोडायच्या आणि त्या स्टँडला गोडाकार गुंडाळून घ्यायच्या.
● उरलेल्या मिऱ्या स्टँडमध्ये आत खोचून त्या सेट करुन घ्या. हे बेसिक एकदा नीट झाले की नंतर फारसा वेळ लागत नाही.आपली साडी नेसताना आपण ज्याप्रमाणे पीन लावतो त्याचप्रमाणे वरच्या काठाजवळ आणि मध्यभागी पीन लावावी. म्हणजे या मिऱ्या व्यवस्थित राहण्यास मदत होते. पुढच्या बाजूच्या मिऱ्या स्टेटनर ने नीट सेट करुन घ्याव्या.
● नंतर मग गौरीच्या शरीराचे छड आणि हात लावावे.यानंतर आपण बाजूला ठेवलेला पदर गौरीच्या उजव्या हाताखालून घेऊन डाव्या खांद्यावर आपण ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे घ्यावा.
● आधीच आपण पदर सेट करुन ठेवल्यामुळे तो नंतर लावायला फारसा वेळ लागत नाही.पदर सेट करुन झाल्यावर गौरीचा मुखवटा निट कापूस लावून छडाला लावून घ्यावा आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार गौरीला एक एक दागिने घालावेत.
● त्यानंतर पदर डोक्यावरुन घ्यायला आवडत असेल तर डोक्यावरुन घेऊन दुसऱ्या खांद्यावरुन घेऊन उजव्या हातापाशी ठेवावा. पदर देतांना गौराईचे मुखवटे हालणार नाही याची काळजी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.