श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गोकुळ जन्माष्टमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता. श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण अष्टमीचा उपवास करतात आणि भाविकांकडून श्रीकृष्णाची पूजा केली जाते. (gokul janmashtami 2022 muhurat)
यंदा 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहे. हा योग 18 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत वाढत राहणार असून तो सकाळी पावणे नऊपर्यंत असणार आहे. यानंतर ध्रुव योग सुरू होणार असून तो 19 ऑगस्ट रात्री 8.59 वाजेपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात हे योग विशेष मानले जातात. या योगात केलेल्या कामाचे फळ शुभ असते, असे मानले जाते. (18 august shubh muhurat)
यावेळी 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार असल्याचे एका ज्योतिषानी सांगितले आहे. अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.20 वाजता सुरू होणार असून त्याचदिवशी 10.59 ला समाप्त होणार आहे. यानंतर निशीथ पूजा 18 ऑगस्टच्या रात्री 12.03 ते 12.47 पर्यंत चालणार आहे. निशीथ पूजेचा एकूण कालावधी ४४ मिनिटांचा असणार आहे. आणि पारण 19 ऑगस्ट रोजी पहाटे 5.52 नंतर होणार आहे.
यावर्षी जन्माष्टमीच्या तारखेबाबत बरेच मतभेद आहेत, असेही ज्योतिषी म्हणाले आहेत. काही 18 ऑगस्टला तर काही 19 ऑगस्टला जन्माष्टमी असल्याचा दावा करत आहेत. काही जाणकारांचे मत आहे की भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला होता. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी हा योग तयार होत आहे. तर काहींच्या मते 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस अष्टमी तिथी असेल आणि सूर्योदयही याच तारखेला होईल. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पण धार्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला. त्यामुळे हा उत्सव 18 ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्राच्या मूहुर्तावर झाला होता. मात्र यावेळी 18 आणि 19 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रोहिणी नक्षत्राचा योग आलेला नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, 19 ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र रात्री उशिरा 1.53 पर्यंत राहणार आहे. यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल. त्यामुळे यावेळी जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा योगायोग होणार नाही.
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या आधी रात्री हलका आहार घ्यावा. विशेषत: जन्माष्टमीच्या दिवशी सूर्य, सोम, यम, काल, संधि, भूत, पवन, दिक्पति, भूमी, आकाश, खेचर, अमर, ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. यानंतर विधिपूर्वक भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी, असंही ज्योतिषांनी सांगितलं आहे. जन्माष्टमीच्या दिवशी लोक एक दिवसाचा उपवास करतात. प्रभूच्या जन्मानंतर लोक उपवास सोडतात. मध्यरात्रीनंतर पूजेला सुरुवात केली जाते. यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घातले जाते. परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून पाळण्यात बसवले जाते आणि भक्तिगीते गात त्याची पूजा केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.