यंदा १८ व १९ ऑगस्टला गोकुळाष्टमी साजरी होणार आहे. कृष्णाचे भक्त या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत असतात. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला होता.
भक्तांमध्ये या दिवसाचा उत्साह फार आधीपासून दिसतो. बाळकृष्णाला सजवण्यासाठी भक्त खरेदी सुरू करतात. त्यांमुळे बाजारही या सामानाने फुललेला असतो. बाळकृष्णासाठी कपडे, बासरी, श्रृंगाराचे सामान, पाळणा, झुला सजवण्याचे सामान असे बरेच काही बाजारात आलेले असते. लोक ते फार श्रध्देने खरेदी करतात.
जर तुम्हालाही तुमच्या बाळकृष्णाला, त्याच्या झुल्याला सजवण्याच्या आयडिया शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. इथे काही टिप्स देत आहोत ज्यामुळे बाळकृष्ण व त्याचा झुला तुम्ही खूप आकर्षक पध्दतीने सजवू शकतात.
असे सजवा बाळकृष्णाला
बाळकृष्णाची लहानशी मूर्ती घ्या. त्याला नवीन कपडे घाला. त्यावर आभूषणे, मुकूट, गळ्यात ताज्या फुलांची माळ घाला. झुल्यात बासरी ठेवून बाळकृष्णाला त्यात बसवा.
असा सजवा झुला किंवा पाळणा
बाजारातून तयार पाळणा आणा. पाळणा सवण्यासाठी रंगीबेरंगी लाइट वापरू शकतात. त्यावर मखमली कापड वापरा व छोटी गादी ठेवा. झुल्याच्या आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या, पाने टाकून सजवावे. दिवा लावावा. पाळण्याला एक लहानशी दोरी बांधून ती फुलांनी सजवावी. त्यासमोर रांगोळी काढावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.