80 वर्षांपूर्वीच्या चांदीच्या प्रभावळीवर सोन्याचा मुलामा; 45 तोळे सोन्याचा वापर, अरुंधती महाडिकांच्या हस्ते प्रभावळ देवीला अर्पण

Sharadiya Navratri Festival : ४५ तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून, त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे.
Sharadiya Navratri Festival
Sharadiya Navratri Festivalesakal
Updated on
Summary

८० वर्षांपूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर ट्रस्टतर्फे सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Sharadiya Navratri Festival) पूर्वसंध्येला खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकाराने अंबाबाई देवीसाठी (Ambabai Devi) सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली.

४५ तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून, त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे. घटस्थापनेपासून ही प्रभावळ वापरात येणार आहे. श्री अंबाबाई देवीवरील श्रध्देपोटी भाविकांकडून, रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. ट्रस्टतर्फे यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प केला होता.

Sharadiya Navratri Festival
तुपात चरबीचा अंश आढळला अन् सरकार खाडकन् झालं जागं; आता तुपाच्या टँकरवर असणार GPS, इलेक्ट्रॉनिक लॉक

काल हा संकल्प पूर्ण झाला. ८० वर्षांपूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर ट्रस्टतर्फे सोन्याचा मुलामा देण्यात आला. त्यासाठी २४ कॅरेटचे ४५० ग्रॅम म्हणजेच ४५ तोळे सोने वापरण्यात आले. चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली.

देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला. महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल, गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे. त्यांचाही सत्कार महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, के. रामाराव, महादेव दिंडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.