Gudi Padwa 2024 : गुढी उभारताना कलश उलटा का ठेवतात?

गुढी उभारताना कलश उलटा का ठेवतात? चला तर या विषयी जाणून घेऊया.
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024sakal
Updated on

Gudi Padwa 2024 :

गुढी पाडवा हा मराठी वर्षातील सर्वात पहिला सण असतो. मराठी नवीन वर्षाचा मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवाच्या दिवशी अनेक शुभ काम केले जातात. दिवसाची सुरवात गुढी उभारुन केली जाते.

तुम्ही बघितलं असेल गुढीवर तांब्याचा कलश उलटा घालतात. धर्मशास्त्र सांगते ‘तांब्याचा कलश गुढीवर उलटा ठेवावा', पण तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का? गुढी उभारताना कलश उलटा का ठेवतात? चला तर या विषयी जाणून घेऊया. (Gudi Padwa : why kalash is downward on gudhi)

सनातन धर्मानुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत करतो.

तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरी बाहेर निघतात आणि जमिनीलगतच्या काही स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्‍त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होते.

याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. त्यामुळे कलश हा उलटा ठेवतात

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : वर्षभर टेन्शन फ्री आणि आनंदी रहायचा जाणून घ्या मंत्र, गुढीपाडव्याला हे नक्की करा

तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र
यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होते तर कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून
निर्माण होणार्‍या लहरींनी वायूमंडल शुद्ध होते. त्यामुळे गुढी पाडवाला कडूलिंंब, कलश आणि रेशमी वस्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

याशिवाय कलश गुढीवर उभारण्याआधी त्यावर स्वस्तिक काढावा. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. या चिन्हातून सकारात्मक उर्जा पसरते त्यामुळे धार्मिक कार्यात स्वस्तिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.