Satyanarayan Puja On Guru Purnima : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करण्यात येते. याला आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमाही म्हणतात. महर्षी वेदव्यास यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. असं मानलं जातं की, याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भागवतपुराणाचे ज्ञान दिले, शिवाय वेदव्यासांचा जन्म या दिवशी झाला असं मानलं जातं म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा होतो.
शिवाय या दिवशी काही ठिकाणी भगवान सत्यनारायण कथा ऐकण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व अडचणी दूर होऊन आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं.
पौराणिक मान्यतांनुसार वेद व्यास यांना भगवान विष्णूंचा अंश मानले आहे. म्हणून गुरु पौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचेच रुप मानले जाणाऱ्या सत्यनारायण भगवानची कथा ऐकली जाते. विष्णू पुराणातही हे सांगण्यात आले आहे की, पौर्णिमा तिथी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी महत्वाच्या तिथींपैकी एक समजली जाते.
जर तुमच्या घरात बऱ्याच काळापासून आर्थिक तंगी सुरू असेल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर दर पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा वाचावी. यामुळे धनवृद्धी होते. शिवाय नोकरीत बऱ्याच काळापासून अडचणी सुरू असतील तर त्यातही फायदा होतो.
गुरु पौर्णिमेचा पूजाविधी
जर गुरु पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायणाची पूजा शक्य झाली नाही तर विधीवत भगवान विष्णूंची पूजा केल्यानेही शुभ फळ प्राप्त होते.
या पूजेत तुळस, धूप, दीप, गंध, पुष्प आणि पिवळे फळ अर्पण करावे.
मनःपूर्वक देवाला नमस्कार करून स्मरण करावे. इच्छा मनात ठेवावी.
पूजे नंतर नैवेद्य दाखवावे. सर्वांना प्रसाद वाटावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.