अमवास्या अन् गुरुपुष्यामृत एकत्र मग सोने खरेदी करावी कि नाही?

‘अमावस्या युक्त गुरुपुष्य योग’ हा शुभ का मानला जातोय याबद्दल आज आपण जाणून घेवूया.
Gurupushyamrut
Gurupushyamrutesakal
Updated on

आपल्याकडे साधारणपणे अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी कुठल्याही कामाची सुरुवात केली जात नाही किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार या दिवशी पुर्ण केले जात नाहीत. मात्र आजची अमावस्या गुरुपुष्यामृत योगावर आली असल्याने उपासना, साधना या सोबत महत्वाचे आर्थिक व्यवहार व सोने दाग- दागिने खरेदी ह्यासाठी शुभ मानली जात आहे. नेमके याचे कारण काय? ‘अमावस्या युक्त गुरुपुष्य योग’ हा शुभ का मानला जातोय याबद्दल आज आपण जाणून घेवूया. (Gurupushyamrut Yog and Amvasya buy gold or not)

Gurupushyamrut
Shravan 2022 :श्रावनात घरामध्ये महादेवाची अशी चित्रे लावा,मिळेल सुख शांती

गुरुपुष्यामृत म्हणजे काय?

पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे. पुष्य म्हणजे पोषण करणारा. हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे, सकारात्मकता, उर्जा देणारे आहे. ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते त्या दिवसाला ‘गुरुपुष्य’ म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योगासोबत अमावस्या तिथी असल्यास हा योग अत्यंत दुर्मिळ असा शुभ योग मानला जातो. अशा या अत्यंत दुर्मिळ शुभ योगाला ‘अमृततुल्य लक्ष्मी योग’ असे चिंतामणी प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. (Latest Marathi News)

Gurupushyamrut
Vastu tips : चांगले आरोग्य आणि पैसा मिळवून देण्यात आरसा कसा मदत करेल ?

अमावस्या तरी योग शुभ कसा?

गुरुपुष्यामृत योग हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ योग आहे हे आपण सर्वजण जाणतो. अगदी सराफी दुकानांतून यादिवसाच्या मोठ- मोठ्या जाहिराती केल्या जातात. मात्र अमावस्येला आपण कुठल्याही कामाचा, नविन खरेदीचा शुभारंभ करत नाही. यावर धर्म अभ्यासक सांगतात कि आपल्या संस्कृती परंपरेमध्ये आपण लक्ष्मी आणि कुबेराची पुजा करतो तो दिवस म्हणजे दिवाळीचे लक्ष्मीपुजन आणि या दिवशी सुद्धा अमावस्याच असते मात्र घरोघरी, आणि व्यापारी वर्ग याच दिवशी आपल्याकडील लक्ष्मीचे आणि व्यवहारासाठी लागणाऱ्या वह्यांचे पुजन करुन आपल्यावर सदैव लक्ष्मी- कुबेराचा वरदहस्त असावा यासाठी प्रार्थना करतात. आणि आज त्यामुळे कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा सोने खरेदी करण्यासाठी अमावस्या हि अशुभ नसून शुभ आहेच, आणि यालाच जोडून जर गुरुपुष्यामृत योग येत असेल तर याला दुग्धशर्करा योगच म्हणावा. याचे प्रमाणही प्राचीन ग्रंथात चिंतामणी दिले असून याच ग्रंंथात या योगाला ‘अमृततुल्य लक्ष्मी योग’ असे म्हटले आहे.

Gurupushyamrut
Gatari Amavasya: गटारी नव्हे तर 'गताहारी'

आज या गोष्टींना आवर्जून प्रारंभ करावा

ह्या योगावर केलेले जप, ग्रंथ पोथी वाचन, पारायण, तप, ध्यान धारणा, दान हे फलदायी ठरते. कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्री गणेशा ह्या योगावर केला असता यश नक्कीच मिळते. भगवंताची आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात. ह्या योगावर केलेली श्री महालक्ष्मीची साधना सुद्धा विशेष फलदायी होते. गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते म्हणून ह्या योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण, जपजाप्य हे या दुर्मिळ गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून केले जातात/ अवश्‍य करावे असे विद्वान सांगतात.

Gurupushyamrut
Som Pradosh Vrat : सोमप्रदोष व्रत म्हणजे नेमक काय ?

कसल्याही असोत यातना त्या आज निरसन होतील

अत्यंत दुर्मिळ अशा ‘अमृततुल्य लक्ष्मी गुरुपुष्यामृत’ योगावर श्रीगुरु चरित्र, नवनाथ कथासार, गजानन विजय ह्या कोणत्याही ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला यशाचा मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते. आपल्या अध्यात्मिक प्रगती, उपासना, साधनेसाठी आणि शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य ‘गुरुपुष्य योग’या वर्षी येत आहे.

Gurupushyamrut
‘या’ पाच राशींच्या लोकांना असते दिखावा करण्याची सवय

‘गुरुपुष्यामृत’ योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे. प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा, कुलदेवतेचा, इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरुपी साधना करून आपले जीवन सार्थ करावे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून यादिवशी साधनेला आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा. अश्या प्रकारे अमावस्या युक्त अमृतसिद्धी योग उपासना, तसेच सोनेखरेदी, नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी अत्यंत शुभ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.