Haldi Kunku : चुकीच्या पध्दतीने हळद-कुंकू लावल्याने होते मोठे नुकसान, वाचा योग्य पध्दत

हळद-कुंकू लावण्याची शास्त्रात काही पध्दती सांगितल्या आहेत. त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो.
Haldi Kunku
Haldi Kunkuesakal
Updated on

Best way to put haldi kunku : हिंदू संस्कृतीत घरी सवाष्ण किंवा कुमारिका आली तर तिला हळद-कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडू दिलं जात नाही. सध्याच्या सणावाराच्या दिवसांमध्ये देवाला, येणाऱ्या महिलांना आणि स्वतःच्या कपाळालाही हळद-कुंकू लावण्याचे अनेक प्रसंग येतात. विवाहितेसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार आहे. हळद-कुंकू लावण्याची शास्त्रात काही पध्दती सांगितल्या आहेत. त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे कुंकू कोणत्या बोटानं लावावं? त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्यापेक्षा जाणून घ्या योग्य पद्धत

Haldi Kunku
World Coconut Day 2022: हिंदु संस्कृती नारळ पूजेत का वापरतात? महिला का फोडत नाहीत?

कुंकू लावण्याचे फायदे

सहसा कुंकू दोन भुवयांच्या मध्ये किंवा भुवयांच्या वर, कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. अशा वेळी त्या भागात थोडासा दाब दिला जातो. हे तेच बिंदू असतात ज्यामुळं चेहर्‍याच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो.

Haldi Kunku
‘धर्म, संस्कृती, परंपरा जपताना आचरण महत्त्वाचे’

कुंकू कधी आणि कसं लावावं?

अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावणं फायद्याचं ठरतं. असं केल्यामुळं शरीरात कुंकवाची ताकद संचारते असं म्हणतात.

Haldi Kunku
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन

कोणा दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावायचं झाल्यास, मध्यमेचा वापर करण्याचा सल्ला शास्त्र देतं. पुरुष किंवा महिला, दुसर्‍यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करणं फायद्याचं ठरतं अशी मान्यता आहे.

दुसर्‍या व्यक्तीला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात बोटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मध्यमा बोटाचं बळ ते थोपवून धरतं आणि आपल्या शरीराचं रक्षण करतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.