Hanuman Jayanti 2023 : तुमची मुलं दृष्ट लागून वारंवार आजारी पडताय? मग हनुमान जयंतीला करा हा उपाय

यंदाच्या हनुमान जंयतीला तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा
Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023 esakal
Updated on

Hanuman Jayanti 2023 : यंदा 6 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शुक्र ग्रह त्याची राशी बदलत आहे. त्याचबरोबर शनिही 30 वर्षांनंतर या वर्षी स्वराशी कुंभात विराजमान आहे. याशिवाय स्वराशी मीनमध्येही गुरु विराजमान आहेत. आणि काही दिवसात ते मेष राशीत संक्रमण करणार आहे. तेव्हा यंदाच्या हनुमान जंयतीला तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा.

ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थसिद्धी योगात हनुमान जन्मोत्सव सुरू होत आहे. यासोबत हस्त आणि चित्र योगही या दिवशी तयार होत आहेत. या दिवशी, वाईट नजरेपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी केलेले अनेक उपाय खूप फायदेशीर आणि प्रभावी ठरतील. या दिवशी हे उपाय केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितले जाते. जाणून घ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करावयाचे उपाय.

Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti : एप्रिलमधे या राशींवर बजरंगबलीची विशेष कृपा, सोन्यासारखं उजळेल भाग्य

हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जुन करा हे उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीच्या विशेष मुहूर्तावर अनेक शुभ संयोग घडत आहेत. अशा परिस्थितीत काही विशेष उपाय केल्यास त्याचा परिणाम लवकरच दिसून येतो. शक्य असल्यास या दिवशी सुंदरकांड पठण करावे. हनुमानजींना सिंदूर, चोळा, चमेलीच्या फुलांची माळ आणि लाडू अर्पण करा. जर मुलाला दृष्ट लागली असेल तर मंदिरात जाऊन हनुमानजीचे सिंदूर घेऊन बाळाच्या छातीवर लावा. हा उपाय केल्याने वाईट नजरेतून बाळाची सुटका होईल. (astrology)

Hanuman Jayanti 2023
Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती पावणार, या 4 राशींवर बरसणार बजरंगबलीची कृपा

हनुमान जन्मोत्सव पूजा मुहूर्त 2023

हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती यावेळी 6 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी तिथी सकाळी १०.४० मिनिटांपर्यंत आहे. हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि उदयतिथीनुसार हनुमान जन्मोत्सव 6 एप्रिललाच साजरा केला जाणार असल्याचे सांगितले जाते. हनुमानजीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:06 ते 7:40 आहे. या दिवसाचा अभिजीत मुहूर्त दुपारी 12.02 ते 12.53 पर्यंत आहे. (Hanuman Jayanti)

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.