Health Mantra : या मंत्रांचा जप कराल तर सगळे आजार पळतील दूर, वाचा शास्त्र काय सांगतं

तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर या मंत्रांचे ध्यान करा
Health Mantra
Health Mantraesakal
Updated on

Health Mantra : हिंदू धर्मात मंत्रोच्चाराचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की तुमची समस्या कितीही मोठी असली तरी तुम्ही दररोज मंत्रांचे ध्यान केले तर तुमची समस्या आपोआप दूर होते आणि तुमची मानसिक स्थितीही स्थिर राहते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत योगा आणि व्यायाम देखील केला पाहिजे. यासोबतच तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर या मंत्रांचे ध्यान करा. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे चमत्कारी मंत्र.

तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील हे मंत्र

खरे तर पूर्वीच्या काळी ऋषीमुनीही मंत्र जपत असत आणि अशा प्रकारे ते स्वतःला निरोगी ठेवत असत. धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या या मंत्रांचा नियमित जप केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळतेच शिवाय व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्यही मिळते. यासोबतच मंत्रांमध्ये अशी अलौकिक शक्ती असते, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते.

गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंत्र - जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त असेल तर त्याने गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे मानसिक शांतीही मिळते.

ऊं भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्। 

आरोग्य लाभासाठी मंत्र - आरोग्य लाभासाठी दुर्गा सप्तशतीच्या या मंत्राचा नियमित १०८ वेळा जप करा आणि माँ दुर्गाकडून उत्तम आरोग्याची कामना करा.

देहि सौभाग्यमारोग्यं, देहि मे परमं सुखं। 
रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि।।

Health Mantra
 Health Tips : पोट साफ न होण्यास कारणीभूत ठरतात हे पदार्थ, आजपासूनच खाणं बंद करा!

हृदयविकाराच्या रोगासाठी विशेष मंत्र - सूर्यासमोर या मंत्राचा जप केल्याने हृदयविकाराच्या समस्येपासून आराम मिळतो. औषधांसोबतच या मंत्राचा नियमित जप केल्यास फायदा होईल. (Health)

क्क घन्नघ मित्रामहः आरोहन्नुत्तरां दिवम्। 
हृद्रोग मम् सूर्य हरि मांण् च नाश्यं’।।

Health Mantra
World Health Day 2023 : हृदयविकाराने रोज किमान एक मृत्यू; आपणही हृदयरोगी आहोत का?

आरोग्यासाठी मंत्र - निरोगी आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी भगवान शिवाच्या या मंत्राचा जप करा, रुद्राक्षाची किमान एक माळ जप करा. (Astrology)

‘क्क जूं सः माम्पालय पालय सः जूं क्क’ 

डिस्क्लेमर - वरील लेख शास्त्रामधे सांगितलेल्या माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.