Calendar 2024 : हिंदू मराठी नव्या वर्षाचे हे आहेत सगळे सणवार, जाणून घ्या २०२४ सालातील संपूर्ण तारखा अन् महती एका क्लिकमध्ये

मराठी नववर्षाची सुरूवात ही गुढीपाडवा या सणाने होते. हा सण चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो.
hindu calendar 2024
hindu calendar 2024sakal
Updated on

मराठी नववर्षाची सुरूवात ही गुढीपाडवा या सणाने होते. हा सण चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरूवात याच सणापासून होते.

उद्या ९ एप्रिलला गुढीपाडव्याचा सण आहे. त्यामुळे, यंदाच्या मराठी नववर्षामध्ये कोणकोणते हिंदू सण साजरे केले जाणार आहात? आणि ते कोणत्या महिन्यात आहेत? ते आपण प्रत्येक मराठी महिन्यानुसार जाणून घेणार आहोत.

चैत्र (एप्रिल 2024)

गुढीपाडवा (९ एप्रिल)

चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या सणाला विशेष असे महत्व आहे. या सणापासूनच मराठी नववर्षाची सुरूवात होते. ९ एप्रिलला हा सण साजरा केला जाईल.

श्रीराम नवमी (१७ ए्प्रिल)

चैत्र शुक्ल नवमी तिथीला श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे. हा दिवस प्रभू श्रीरामांचा जन्मदिन म्हणून मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. १७ एप्रिलला श्रीराम नवमी साजरी केली जाईल.

हनुमान जयंती (२३ एप्रिल)

हिंदू धर्मानुसार यंदाची हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाईल. हा दिवस बजरंगबली हनुमान यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी हनुमान जयंती २३ एप्रिलला साजरी केली जाईल.

वैशाख (मे २०२४)

अक्षय्य तृतीया (१० मे)

दरवर्षी वैशाख या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या अक्षय तृतीयेला अखाती असे ही म्हटले जाते. यंदा अक्षय्य तृतीया १० मे ला साजरी केली जाईल. अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीच क्षय होत नाही. कारण, अक्षयतृतीयेतील अक्षय म्हणजे ‘जे कधीही संपत नाही असे’ आणि म्हणूनच हा दिवस फार महत्वाचा असतो. या दिवशी पितरांचे आणि देवांचे पूजन केले जाते.

बुद्धपौर्णिमा – वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा २३ मेला बुद्धपौर्णिमा साजरी केली जाईल.

ज्येष्ठ (जून २०२४)

वटपौर्णिमा (२१ जून)

ज्येष्ठ महिन्यातील सूवासिनींसाठी महत्वाचा असलेला सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण होय. या दिवशी सूवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला ७ फेऱ्या घालतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सूवासिनी देवाकडे प्रार्थना करतात. २१ जूनला ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण यंदा साजरा केला जाईल.

अंगारक संकष्ट चतुर्थी

अंगारक संकष्ट चतुर्थी हा दिवस हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो. ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी २५ जूनला ही चतुर्थी साजरी केली जाईल. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असून अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी अनेक जण व्रत करतात आणि उपवास धरतात.

आषाढ (जुलै २०२४)

देवशयनी आषाढी एकादशी (१७ जुलै)

आषाढ महिन्यात सर्वांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे. या आषाढी एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असे म्हटले जाते. ही एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा ही एकादशी १७ जुलैला साजरी केली जाईल. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या दिवशी असंख्य भाविक उपवास धरतात आणि विठुरायाच्या चरणी लीन होतात.

गुरूपौर्णिमा (२१ जुलै)

आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतातील हा एक महत्वाचा सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. त्यामुळे, या दिवशी गुरूला वंदन करून त्याचे पूजन केले जाते आणि गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदा हा सण २१ जुलैला साजरा केला जाईल.

श्रावण (ऑगस्ट २०२४)

शंभू महादेवांचा प्रिय महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्रावण महिन्यात विविध सणांचा समावेश असतो. धार्मिक दृष्टींनी या श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे.

नागपंचमी (९ ऑगस्ट)

श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा नागपंचमीचा सण यंदा ९ ऑगस्टला साजरा केला जाईल.

रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा (९ ऑगस्ट)

भाऊ-बहिणीला समर्पित असणारा हा रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्टला साजरा केला जाईल. याच दिवशी (१९ ऑगस्टला) नारळी पौर्णिमेचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. समुद्राला शांत करण्यासाठी आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा नारळपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

श्रीकृष्ण जयंती (२६ ऑगस्ट)

भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ही श्रीकृष्ण जयंती २६ ऑगस्टला साजरी केली जाईल.

गोपाळकाला (२७ ऑगस्ट)

श्रीकृष्ण जयंतीनंतर गोपाळकाला साजरा केला जातो. हा गोपाळकाला २७ ऑगस्टला साजरा केला जाईल.

भाद्रपद (सप्टेंबर २०२४)

पोळा (२ सप्टेंबर)- भाद्रपद महिन्यातील पोळा यंदा २ सप्टेंबरला साजरा केला जाईल.

हरितालिका तृतीया (६ सप्टेंबर)- हरितालिका तृतीया ६ सप्टेंबरला साजरी केली जाईल.

गणेश चतुर्थी (७ सप्टेंबर)- यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरी केली जाईल. या दिवशी घरोघरी गणपतीची स्थापना करण्यात येईल.

गौरीपूजन (१० सप्टेंबर)- यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन हे १० सप्टेंबरला केले जाईल, तर ११ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन केले जाईल. त्यानंतर, १२ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जन केले जाईल.

अनंत चतुर्दशी (१७ सप्टेंबर)- १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाईल.

आश्विन (ऑक्टोबर २०२४)

शारदीय नवरात्रौत्सव (३ ऑक्टोबर)

३ ऑक्टोबरला आश्विन शुद्ध नवमीला शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. याच दिवशी घटस्थापना केली जाईल.

दुर्गाअष्टमीची पूजा ११ ऑक्टोबरला केली जाईल.

दसरा (१२ ऑक्टोबर)

यंदा विजयादशमीचा सण १२ ऑक्टोबरला साजरा केला जाईल.

दुर्गा विसर्जन (१३ ऑक्टोबर)

दसरा झाल्यानंतर १३ ऑक्टोबरला दुर्गा विसर्जन केले जाईल.

कोजागिरी पौर्णिमा

यंदा १६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल.

दिवाळी

वसूबारस, रमा एकादशी, गोवत्स द्वादशी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस २८ ऑक्टोबरला साजरा केला जाईल. वसूबारस या सणाने दिवाळीची सुरूवात होईल.

धनतेरस – २९ ऑक्टोबर

नरक चतुर्दशी – ३१ ऑक्टोबर

लक्ष्मीपूजन – १ नोव्हेंबरला (आश्विन अमावस्येला साजरे केले जाईल.)

कार्तिक (नोव्हेंबर २०२४)

बलिप्रतिपदा (दीपावली पाडवा) हा दिवस २ नोव्हेंबरला साजरा केला जाईल.

भाऊबीज - ३ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाईल.

मार्गशीर्ष (डिसेंबर २०२४)

श्रीदत्त जयंती – यंदा १४ डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाईल.

पौष (जानेवारी २०२५)

मकरसंक्रांती, पोंगल, उत्तरायण – १४ जानेवारी २०२५

माघ (फेब्रुवारी २०२५)

वसंत पंचमी – २ फेब्रुवारी २०२५

रथसप्तमी – ४ फेब्रुवारी २०२५

छत्रपती शिवाजी महाराज जयंती - १९ फेब्रुवारी २०२५ (१३ तारखेला फाल्गुन महिना प्रारंभ)

फाल्गुन (फेब्रुवारी २०२५)

महाशिवरात्री – २६ फेब्रुवारी

होळी पौर्णिमा – १३ मार्च (होलिका दहन)

धूलिवंदन – १४ मार्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.