Marriage Rituals And Science : लग्नाच्या विधीं मागची वैज्ञानिक कारणं माहितीयेत? जाणून घ्या सविस्तर

हिंदू धर्मात विधीवत लग्नाला फार महत्व आहे. पण त्यामागचं सायंस तुम्हाला माहितीये?
Marriage Rituals And Science
Marriage Rituals And Scienceesakal
Updated on

Science Behind Hindu Marriage Rituals : हिंदू धर्मात विधीवत लग्नाला फार महत्व आहे. लग्नातली प्रत्येक विधी व्यवस्थितरित्या पूर्ण होणे महत्वाचे समजले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, या विधींचा जेवढे धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे, तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्वदेखील आहे. जाणून घ्या.

Marriage Rituals And Science
Marriage Rituals And Scienceesakal

मेंदी लावण्यामागचे सायंस

मेंदीला शुभ कार्यांमध्ये फार महत्व आहे. पण यामागे औषधीयपण कारण आहे. मेंदी थंड असते. यामुळे मानसिक ताण दूर होतो. शिवाय याच्या सुगंधाने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. त्यामुळे लग्ना आधीचा मानसिक ताण दूर होण्यासाठी मेंदी लावण्याचं महत्व आहे.

हळद का लावली जाते?

आयुर्वेदात हळदीचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. लग्नाआधी नवरदेव, नवरीला हळद लावण्याची परंपरा फार जूनी आहे. हळदीने फक्त रंगच उजळत नाही तर हळद अँटीसेफ्टिक असते. त्वचेवरील जीवणू नष्ट होतात. ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. यामुळे वधु वराच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगली होते.

Marriage Rituals And Science
Marriage Rituals And Scienceesakal

कुंकू किंवा सिंदूर लावणे

लग्नात किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात कुंकू लावण्याची पद्धत आहे. हे केवळ सौभाग्याचे लक्षण म्हणून नाही. कुंकू बनवताना त्यात हळद, लिंबू आणि फार कमी प्रमाणात पारा घातला जातो. कुंकवातल्या हळद आणि पाऱ्यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि ताण दूर होतो.

सप्तपदीतल्या अग्नीकुंडाचे महत्व

हिंदू लोक अग्नीला देवता समजतात. कोणत्याही धार्मिक कार्यात जसे हवन, विवाह, गृह प्रवेश एवढेच नव्हे तर देवापुढे दिवा लावून प्रत्येक कार्यात अग्नीला साक्षी मानले जाते. पण हे झाले धार्मिक कारण. वैज्ञानिक कारणही आहे. हवन केल्यानंतर निघणाऱ्या धुराने वातावरण शुद्ध होते. यात समिधा, तूप घातल्याने निघणाऱ्या धुराने वातवरणातले किटाणू नष्ट होतात, माणसाला शुद्ध हवा मिळते. ज्यामुळे मन प्रसन्न आणि सकारात्मक राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.