Hindu Mythology Mahabharat Curse : कौरव पांडवांमध्ये झालेल्या महाविनाशक महाभारत युद्धात पांडवांच्या शौर्याप्रमाणेच कर्णाच्या वीरतेचेही स्वतंत्र वर्णन आहे. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे कर्ण कुंती पुत्र असल्याचं तिने पांडवांपासून लपवून ठेवलं होतं. कुंतीने आपल्या तपस्येने ऋषी दुर्वासांना प्रसन्न केलं होतं. यावर प्रसन्न होऊन ऋषी दुर्वासा यांनी कुंतीला एक मंत्र वरदान म्हणून दिला होता.
ऋषी दुर्वासांनी सांगितलं होतं की, या मंत्रो उच्चारण ज्या देवतेचे आवाहन करून करशील त्या देवतेच्या कृपेने तुला पुत्र होईल. याची सत्यता पडताळण्यासाठी कुंतीने चुकून सुर्य देवतेला आवाहन करत मंत्र उच्चारण केला, ज्यामुळे तिला कर्ण हा पुत्र झाला. पण विवाहापूर्वी झालेल्या या मुलाला तिने लोक लाजेस्तव पाण्यात वाहून दिले. पण आई म्हणून तिला त्याच्याविषयीचं प्रेम कायम होतं.
नंतर कुंतीचा विवाह महाराज पांडूशी झाला. त्यांच्या सोबत मंत्रोच्चार आणि देवतांना आवाहन करून युधिष्ठीर, भीम, अर्जून, नकुल आणि सहदेव हे पाच पुत्र झाले. पण कर्णाविषयी तिने कोणालाही सांगितले नाही.
कर्ण महाभारतात कौरवांच्या सेनेत होता. पण पांडवांना कर्ण आपला भाऊ आहे हे माहित नव्हतं. युद्धात कर्ण मारला गेला. त्यावेळी कुंती धावत कर्णाकडे आली. त्यावेळी तिने युधिष्ठीराला सर्व सत्य सांगितलं. कर्ण आपला मोठा भाऊ असून त्याला मारले याचं युधिष्ठीराला दुःख झालं. आणि आईने हे आपल्यापासून लपवून ठेवल याचा त्याला रागही आला.
त्या रागात युधिष्ठीराने सर्व स्त्री जातीलाच शाप दिला की, कोणीही स्त्री ठरवूनही कोणतीही गोष्ट मनात लपवून ठेवू शकत नाही. म्हणून मानलं जातं की, महिलांच्या पोटात कोणतीही गोष्ट टिकत नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.