Brahma Muhurat Benefits : आपल्या वेद पुराण आणि ग्रंथांमध्ये ब्राह्म मुहूर्ताला फार शुभ मानलं गेलं आहे. घरातले मोठे लोकही ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नान पूजा करायचे सांगतात. प्राचीन काळापासून ब्राह्ममुहूर्ताच विशेष महत्व सांगितलं आहे. यामुळे सौंदर्य, बल, विद्या, बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं.
ब्राह्ममुहूर्तावर दिनश्चर्या सुरू केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. यामुळे सकारात्मक उर्जा जाणवते. पण तुम्हाला माहितीये का की, या वेळी काही कामं केल्याने नकारात्मक परिणामही होतात. जाणून घ्या अशी कोणती कामं आहेत.
ब्राह्म मुहूर्तावर या गोष्टी टाळा
जेवण करू नका
काही लोक ब्राह्म मुहूर्तावर उठतात आणि उठल्याबरोबर चहा नाश्ता करतात. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय उठल्याबरोबर चुकूनही जेवण करू नका. असं केल्याने तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात.
सेक्स करू नये
ब्राह्म मुहूर्त ईश्वराच्या पूजेचा असतो. ही वेळ फार पवित्र समजली जाते. या काळात चुकूनही लैंगिक संबंध ठेवू नये. आयुर्वेदानुसारही या वेळात संबंध ठेवणे वर्जित केले आहे. यामुळे शरीरात विविध रोगदोष निर्माण होऊ शकतात. आयुष्य कमी होतं.
मनात नकारात्मक विचार आणू नका
ब्राह्म मुहूर्तावर माणसाचं डोकं जागृत अवस्थेत असतं. आयुष्याचे महत्वपूर्ण निर्णय घेणे, म्हत्वाच्या योजना आखणे यासाठी हा काळ महत्वाचा समजला जातो. त्यामुळे यावेळात कधीही नकारात्मक विचार करू नये. नाहीतर संपूर्ण दिवस तणावपूर्ण जातो. मानसिक आजार जडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.