Hindu Religion : लग्नात वरमालेचे महत्व काय आहे? अनेकांना माहित नसतं महत्व

हिंदू विवाह पद्धतीत वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्याचा विधी महत्वपूर्ण मानला जातो.
Hindu Religion
Hindu Religionesakal
Updated on

Hindu Wedding Varmala Rituals : हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांना विशेष महत्व आहे. त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार म्हणून विवाहाकडे बघितलं जातं. विवाह संस्कारातील सर्व चालीरिती आजही नीट पाळल्या जातात. यातील वरमाला घालण्याची एक प्रथा आहे जी रामायण, महाभारत काळापासून चालत आली आहे.

Hindu Religion
Hindu Religionesakal

या प्रथेचा उल्लेख वेदांमध्येही केला आहे. विवाहासंदर्भात पाळल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या परंपरांपैकी ही एक आहे. भारतात यात थोडेफार फरक दिसत असले तरी सर्वत्र पाळली जाते. दक्षिण भारतात हार मोठा आणि जाड असतो तर उत्तर भारतात बारीक आणि हलका असतो. महाराष्ट्रात मंगलाष्टक झाल्यावर वर-वधू एकमेकांना वरमाला घालतात. पण यामागचं महत्व काय आहे, हे जाणून घेऊया.

काळानुसार बदल

एकेकाळी वदू लाजत वराला हार घालायची आणि बाकीचे लोक शांतपणे उभे राहून पाहत असत. पण आता या विधीवेळी खूप मस्ती केली जाते. विधीचे गांभीर्य जाऊन याकडे एक मनोरंजन म्हणून बघितले जाते. वधूवराला वऱ्हाडी उचलून धरतात अन् मग मस्ती करत एकमेकांच्या गळ्यात माळ घातली जाते.

Hindu Religion
Hindu Religionesakal

विधीचे महत्व

फुलांचे हार घालण्याचा इतिहास भगवान शंकर-पार्वती आणि श्रीराम-सीता यांच्या विवाहापासूनचा आहे असं मानलं जातं. स्वयंवर जिंकलेल्या वराला उपवर वधू त्यांच्या गळ्यात जयमाला घालते. त्याला हार घालून ती वरते म्हणून त्याला वरमालाही म्हणतात. दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकमेकांना पतीपत्नी म्हणून स्वीकारतात.

वधू पहिले वरमाला का घालते?

ही परंपरा सुरु झाली त्यावेळी पुरुषांना स्त्रीशी लग्न करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागत होते. त्यामुळे मुलींचे स्वयंवर व्हायचे. त्यामुळे मुलगी तिच्या आवडीच्या पुरुषाला वरमाला घालून लग्नासाठी त्याची निवड करायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.