हिंगोलीत रिंगण सोहळा उत्साहात

संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आतषबाजीने स्वागत
Hingoli Sant Namdev Maharaj palkhi
Hingoli Sant Namdev Maharaj palkhisakal
Updated on

हिंगोली : हिंगोली येथील संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे रविवारी अग्रसेन चौकात आगमन होताच आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहाला रामलीला मैदानावर पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

आषाढी एकादशीनिमित्त संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. नर्सी नामदेवहून ही पालखी आज हिंगोली शहरात दाखल झाली व मुक्कामी आहे. अग्रसेन चौकात पालखीचे जंगी स्वागत झाल्यानंतर इंदिरा चौक, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, जुन्या नगरपरिषदेजवळून ती रामलीला मैदानावर दाखल झाली. तेथे सायंकाळी सहाला रिंगण सोहळा सुरू झाला. टाळ- मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांकडून विठ्ठल, संत नामदेव महाराज यांचा जयघोष सुरू होता. अश्वाने फेरी मारल्यानंतर भाविकांनी त्याच्या पायाखालची माती डोक्याला लावत दर्शन घेतले.

माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, सुभाष बांगर, अँड के. के. शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक अधीक्षक सतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे आदी उपस्थित होते.

दुसरे रिंगण अंबाजोगाईत

पालखी सोहळा सोमवारी पुढे मार्गस्थ होईल. दुसरे गोल रिंगण अंबाजोगाई (जि. बीड) येथे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.