Battle of Panipat : ऐतिहासिक पानिपत युद्धाचा २६३ वा शौर्य दिन साजरा

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, मात्र त्यांचा पराक्रम कधीही विसरला जाऊ शकत नाही. मराठ्यांचा चिवटपणा आणि हिंमत पाहून अब्दाली परत हिंदुस्थानात आला नाही.
panipat
panipatSakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘मराठ्यांनी २६३ वर्षांपूर्वी दाखवलेल्या पराक्रमामुळे अब्दाली परत हिंदुस्थानात फिरकला नाही’’, असे प्रतिपादन इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी आज ​हरियानातील पानिपतमध्ये २६३ व्या शौर्य दिवस कार्यक्रमात बोलताना केले.

कोकाटे म्हणाले, की पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, मात्र त्यांचा पराक्रम कधीही विसरला जाऊ शकत नाही. मराठ्यांचा चिवटपणा आणि हिंमत पाहून अब्दाली परत हिंदुस्थानात आला नाही. कार्यक्रमात इथले मूळ मराठा मोठ्या संख्येने सहभागी होतात, ही आनंदाची बाब असल्याचे कोकाटे म्हणाले.

कार्यक्रमास माजी आयएएस अधिकारी मराठा वीरेंद्र, राजेश चोपडे, मांगेराम चोपडे आदी उपस्थित होते. दरम्यान, हे युद्ध झालेल्या काला आम येथे धारातीर्थी पडलेल्या मराठा सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.