Holi Astrology
Holi Astrologyesakal

Holi Astrology : होळीनंतर होणाऱ्या ग्रहांच्या युतीने या राशींना भोगावा लागणार त्रास

मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. याचे अशुभ परिणाम या राशींना भोगावा लागणार
Published on

Holi Astrology : ज्योतिषशास्त्रात काही ग्रह शुभ तर काही अशुभ मानण्यात आले आहेत. त्यामुळे शुभ आणि अशुभ ग्रहांच्या युतीमुळे थोड्या जास्त प्रमाणात वाईट परिणामांचा सामना करावा लागतो. म्हणजे वाईट संगतीत चांगले ग्रहही वाईट फळं देतात, असं ज्योतिषी सांगतात. शुक्र हा भौतिक सुख, कला आणि सौंदर्यकारक ग्रह आहे. शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असली की चांगली फळ मिळतात. पण राहु, केतु आणि मंगळ या सारख्या अशुभ ग्रहांसोबत युती झाली तर शुभ ग्रहपण तशीच फळं देतात.

शुक्र मेष राशीत १२ मार्चला प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. ही युती ६ एप्रिल २०२३ पर्यंत असणार आहे. या दिवसात रोज ओम शुं शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा.

मेष - शुक्र आणि राहुच्या युती या राशीच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे जोडिदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीशी जवळचे नाते निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. तरुणांना प्रेमात विरह सहन करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत काही घडामोडी या काळात घडतील. वाद टाळण्यासाठी वाणीवर ताबा ठेवा.

वृषभ - या युतीमुळे जीवनात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे जपून राहणं व वागणं आवश्यक आहे. जुने संबंध आपल्या वादाचे कारण ठरू शकतात. प्रेम जीवनात आपली पावलं सावध उचला. वागण्यावर नियंत्रण ठेवा. वाद टाळा, जोडिदाराचं मन दुखवू नका.

Holi Astrology
Astro Tips : या राशींचे लोक करता आहेत जगावर राज्य; पहा यात तुमची रास आहे का?

कन्या - या काळात तुमचं वागणं थोडं बदललेलं दिसेल. व्यवहारात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. सावध रहा. अपघाताची शक्यता आहे. जोडिदाराला प्राधान्य द्या. घाईने निर्णय घेणं टाळा.

मीन - या राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा असल्याने जास्त त्रास होईल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार नाही. पती-पत्नीत वाद होऊ शकेल. विनाकारण कौटुंबिक वाद टाळा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.