इनर इंजिनिअरिंग : जलद मार्गावर उत्क्रांती करा!

तुम्ही माकड होता तेव्हा तुम्ही मनुष्य होणे निवडले नव्हते.
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशनSakal
Updated on

‘उत्क्रांती’ या शब्दाचा अर्थ, एखादा जीव स्वतःला हळूहळू एका उच्च संभावनेत बदलत आहे. चार्ल्स डार्विनने तुम्हाला सांगितले, की तुम्ही सगळे माकड होता, आणि नंतर तुमची शेपटी गळून पडली आणि तुम्ही मनुष्य झालात - तुम्हाला संपूर्ण कथा माहीत आहे. तुम्ही माकड होता तेव्हा तुम्ही मनुष्य होणे निवडले नव्हते. निसर्गानेच तुम्हाला पुढे ढकलले. तुम्ही प्राणी रूपात असता, तेव्हा उत्क्रांती आपोआप होते तुम्हाला त्यासाठी विशेष काही करायची गरज नसते, मात्र एकदा का तुम्ही मनुष्य बनलात, एकदा का चेतनेची एक विशिष्ट पातळी गाठली, मग तुमच्यासाठी उत्क्रांती आपोआप होत नाही. जाणीवपूर्वक शोध घेतला तरच ते घडून येईल.

तुम्ही जीवनाकडे आवश्यक जागरूकतेने पाहिले, तर तुम्ही बघाल की खुद्द जीवनाची प्रक्रिया - ज्या कशाला आपण जगण्याची प्रक्रिया म्हणून संबोधतो - हा एक विशिष्ट शोध आहे, एक विशिष्ट इच्छा आहे, आपल्या अंतिम स्वरूपामध्ये सामील होण्याची, विकसित होण्याची आणि वाढण्याची. आपल्या अस्तित्वाचा स्वभावच असा आहे, की त्याला अंतिम आयामापर्यंत जायचे आहे - मग तो काहीही असो.

सर्व काही विकसित झाले पाहिजे ही जीवनाची कल्पना आहे. तुम्ही त्यासाठी काम केले नाही, तर तुम्ही त्या प्रक्रियेने चिरडले जाल. बाकी काही होणार नाही, कारण ती खूप मोठी शक्ती आहे. ती अशी गोष्ट नाही, जिच्याशी तुम्ही झगडावे, ती अशी गोष्ट आहे जिच्याबरोबर तुम्ही जुळवून घ्यावे. या शक्तीचाच थोडाफार संकेत डार्विनला जाणवला. त्याने स्वत:च्या पद्धतीने हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याचा पुढे उत्क्रांतीचा सिद्धांत बनला, परंतु मुळात तो तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही जर संपूर्ण चित्र पाहिले - तर एक पेशी प्राण्यापासून तुमच्यापर्यंत - एक मोठी जीवन प्रक्रिया लाखो वर्षांपासून सतत प्रयत्नशील आहे.

ते अशा पातळीवर पोहोचले आहे, की तुम्ही वरच्यावर तरंगत आहात. आता तुम्ही ह्या पातळीवर पोहोचले आहात, जर तुमची बुद्धिमत्ता काम करत असेल तर, मला असे वाटते की तुम्ही ही क्षमता ह्या प्रक्रियेला गती द्यायला वापराल - तुम्हाला निसर्गात होत असलेल्या उत्क्रांतीच्या वेगाने जायचे नाही. एक आध्यात्मिक प्रक्रिया केवळ जीवनाच्या इच्छेला गती देण्याबद्दल बोलत आहे. आपण एका वेगळ्याच शक्यतेकडे जाण्याच्या जीवनाच्या इच्छेला वेग देत आहोत. आणखी वैज्ञानिक शब्दात सांगायचे झाले तर तुम्हाला उत्परिवर्तन करायचे आहे. तुम्हाला ह्याच जन्मात मुक्ती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही नक्कीच परिवर्तित होण्याची गरज आहे कारण उत्क्रांती ही एक दीर्घ प्रक्रिया आहे.

तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट ऊर्जेच्या उपस्थितीत बसता, जी तुम्ही आहात त्यापेक्षा मोठी शक्यता असेल, तेव्हा फक्त सहज बसण्याची वेळ असते. ती काही मागायची वेळ नाही. तुम्ही नुसते बसलात, तर तुम्हाला अतिशय वेगाने विकसित होण्यासाठी, एका आयामातून दुस-या आयामात परिवर्तित होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळतील. एकदा का तुम्ही एका विशिष्ट संभावनेत वाढलात, की त्या आयामात जे काही शक्य असेल ते तसेही तुमच्याबरोबर घडेलच. ध्यान करणे, मंदिरात जाणे किंवा गुरूंसोबत बसणे ही काही मागायची वेळ नाही, ती आत्मसात करण्याची आणि स्वत:ला एका उच्च संभावनेत बदलण्याची वेळ आहे.

सद्‌गुरू,

ईशा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.