Culture and Traditions : जाड होण्यासाठी गाईच्या दूधात रक्त मिसळून पितात; 'ही' प्रथा तुम्हाला माहित आहे का?

हे लोक ६ महिने गाईचं रक्तमिश्रित दूध पितात. कारण यामुळे ते लवकरच जाड होतील असा त्यांचा विश्वास आहे.
Ethiopia bodi tribe
Ethiopia bodi tribeSakal
Updated on

जगात बारीक होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे अनेक दिसती. असं एक ठिकाण आहे जिथे जाड असणं शक्तीचं लक्षण मानलं जातं. इथं लोक दुधात रक्त मिसळून निरोगी राहण्यासाठी पितात. आणि सर्वात जाड व्यक्तीला नायकाचा दर्जा दिला जातो. तो राज्य करतो.

इथिओपियाच्या बोडी जमातीमध्ये हे मानलं जातं. त्यांची जीवनशैली आणि परंपरा अशा आहेत की, तुम्हीही जाणून थक्क व्हाल.

ओमो व्हॅलीमध्ये राहणाऱ्या बोडी जमातीची कथा एखाद्या थरारक चित्रपटापेक्षा कमी नाही. मुळात ते इथिओपियाचे रहिवासी मानले जातात.जगापासून आणि समाजापासून ते पूर्णपणे वेगळे पडले असूनही हे लोक आपल्या परंपरांशी अजिबात तडजोड करत नाहीत. इथं एक विशेष प्रकारची स्पर्धा आहे, ज्याला कॅल म्हणतात. याद्वारे सर्वात जाड व्यक्तीची निवड केली जाते आणि शेवटी तोच नायक निवडला जातो. समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Ethiopia bodi tribe
Vat Purnima 2023 : पौर्णिमा नक्की कधी? ३ जून की ४ जून? जाणून घ्य़ा मुहुर्त व महत्त्वाच्या वेळा

डेली मेलच्या वृत्तानुसार, स्पर्धेत केवळ अविवाहित पुरुषच भाग घेऊ शकतात. त्यांना ६ महिने वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. भरपूर खाणंपिणं दिलं जातं जेणेकरून ते लठ्ठ होऊ शकतील. हे लोक ६ महिने गाईचं रक्तमिश्रित दूध पितात. कारण यामुळे ते लवकरच जाड होतील असा त्यांचा विश्वास आहे. या काळात शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नाही.

Ethiopia bodi tribe
Vat Purnima 2023 : उपवासाला चालणारा; घराघरात आवडणारा साबुदाणा परदेशातून भारतात कसा आला?

हे अन्न प्रत्येक माणसाला संपूर्ण सहा महिने दिलं जातं. बोडी जमातीत गायींना पवित्र मानलं जातं, त्यामुळे हे लोक त्यांना मारत नाहीत. त्याऐवजी भाल्याने किंवा कुऱ्हाडीने रक्तवाहिनी भोसकून रक्त घेतलं जातं आणि नंतर ती जखम मातीने बंद केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.