Jagannath Rath Yatra 2023 : जगन्नाथ यात्रेतील मूर्तीरूपी प्रतिमा आजही का 'अर्धवट'? जाणून घ्या कारण

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा आषाढच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला आपल्या मावशीच्या घरी जातात.
Jagannath Rath Yatra 2023
Jagannath Rath Yatra 2023esakal
Updated on

Jagannath Rath Yatra 2023 : चार धामा यात्रेसाठी लोकांच्या मनात विशेष श्रद्धा असते.पुरीच्या जगन्नाथ यात्रेला पुरूषोत्तम पुरी,शंख क्षेत्र, आणि श्रीक्षेत्र सारख्या नावाने ओळखल्या जाते.श्री जगन्नाथ देवाला श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो.अतिशय आनंद आणि उल्हासाने दरवर्षी श्री जगन्नाथांची रथ यात्रा काढली जाते.रथयात्रेचा शुभारंभ शुक्ल पक्षात केला जातो.यावर्षी ही रथयात्रा १ जुलैला सुरू होणार असून त्याचा समारोप १२ जुलैला होणार आहे.(Jagannath Rath Yatra News)

दरवर्षी 'जगन्नाथ रथयात्रा' थाटामाटात काढली जाते, ज्यामध्ये देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होण्यासाठी येतात. यावेळी भगवान जगन्नाथाची 146 वी रथयात्रा काढण्यात येत आहे. लाखोंचा जनसमुदाय ओडिसातील पुरी शहरात पोहोचला आहे.

श्री हरीचा पूर्ण अवतार असलेले हे वैष्णव मंदिर श्री कृष्णाला समर्पित आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांची वर्षभर पूजा केली जाते, मात्र आषाढ महिन्यात तीन किलोमीटरच्या अलौकिक रथयात्रेतून गुंडीचा मंदिरात आणले जाते.

लाखो भक्त यात्रेत होतात सहभागी

श्रद्धाळू जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या सजवलेल्या रथाला मोठ्या मोठ्या दोरांनी ओढत जगन्नाथांच्या मावशीच्या घरी गुंडीचा मंदिर येथे घेऊन जातात. (God)हे मंदिर जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर दूर आहे.

या भक्कम रथांना ओढण्यात भक्त त्यांची धन्यता मानतात.या रथांची सजावट पंचतत्वाने केली जाते. लाकूड,धातू,रंग,वस्त्र आणि सजावटीचा यात समावेश असतो. औषधोपयोगी कडूनिंबाच्या झाडाच्या लाकडाचा रथ निर्मितीसाठी उपयोग केला जातो.

Jagannath Rath Yatra 2023
Jagannath Rath Yatra 2023esakal

या रथयात्रेत 'तालध्वज' म्हटलं जाणारं बलरामांचं हिरव्या रंगाचं रथ सर्वात पुढे असतं.मधात सुभद्राचं 'दर्पदलन' नावाचं रथ असतं.आणि श्री जगन्नाथांच 'गरूडध्वज' सर्वात शेवटी असते.जगन्नाथांचा रथ लाल पिवळ्या रंगाचा आहे.

१६ चाकाचा जगन्नाथांचा रथ ४५.६ फूट उंच असतो तर बलरामांच्या रथाची उंची ४५ फूट आणि सुभद्राच्या रथाची उंची ४४.६ फूट उंचीचं असते. या रथाला बनवण्यासाठी कुठल्याही धारदार वस्तूचा उपयोग केला जात नाही. (Jagannath Rath Yatra)

Jagannath Rath Yatra 2023
Jagannath Temple : भारतीय वंशाच्या अब्जाधीशाकडून २५० कोटी दान! ब्रिटनमध्ये बांधलं जाणारं पहिलं जगन्नाथ मंदिर

रथाच्या तिन्ही मूर्त्या का आहेत अर्धवट जाणून घ्या

जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रेच्या मूर्तीचे निर्माण कार्य विश्वकर्मा यांना सोपवण्यात आले होते.यावेळी त्यावेळच्या राजाला विश्वकर्मा यांनी मूर्तीची निर्मिती होत पर्यंत राजाला कक्षात प्रवेश करायला मनाई केली होती.मात्र राजाने त्याची अवहेलना करत कक्षात प्रवेश केला.त्यानंतर विश्वकर्माने मूर्तीचे काम अर्धवटच सोडून दिले.त्याच कारणाने आजही या तिन्ही मूर्त्या अर्धवट आहेत. (Sanskruti)

जगन्नाथ रथयात्रा 2023 : वेळ आणि पूर्ण वेळापत्रक

20 जून 2023 (मंगळवार): जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली (गुंडीचा मावशीच्या घरी जाण्याची परंपरा)

24 जून 2023 (शनिवार): हेरा पंचमी (पहिले पाच दिवस भगवान गुंडीचा मंदिरात वास्तव्य करतात)

27 जून 2023 (मंगळवार): संध्या दर्शन (या दिवशी जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने 10 वर्षे श्री हरीची पूजा केल्याचे पुण्य मिळते)

28 जून 2023 (बुधवार): बहुदा यात्रा (भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे घराकडे परतीचा प्रवास)

Jagannath Rath Yatra 2023
Jagannath Temple : भारतीय वंशाच्या अब्जाधीशाकडून २५० कोटी दान! ब्रिटनमध्ये बांधलं जाणारं पहिलं जगन्नाथ मंदिर

29 जून 2023 (गुरुवार) : सुनाबेसा (जगन्नाथ मंदिरात परतल्यानंतर भगवान आपल्या भावंडांसोबत शाही रूप धारण करतात)

30 जून 2023 (शुक्रवार) : आधर पन्हं (आषाढ शुक्ल द्वादशीला खगोलीय रथांना एक विशेष पेय अर्पण केले जाते. दूध, पनीर, साखर आणि कोरड्या फळांपासून बनवलेले पन्हं म्हणतात)

1 जुलै 2023 (शनिवार) : निलाद्री बीजे (जगन्नाथ रथयात्रेतील सर्वात मनोरंजक विधी म्हणजे निलाद्री बीजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.