Kamada Ekadashi : कामदा एकादशीला हे पठण केल्याने, होतात सर्व इच्छा पूर्ण

दर महिन्याला दोन एकादशी असतात. यादिवशी विष्णू देवाची पूजा करणे उत्तम समजले जाते.
Kamada Ekadashi
Kamada Ekadashiesakal
Updated on

Kamada Ekadashi Vrat Katha Kahani : दर महिन्याला दोन वेळा एकादशी तिथी येते. धार्मिक मान्यतांनुसार एकादशी तिथी विष्णूदेवाला प्रिय आहे. या दिवशी विष्णूची पूजा केल्याने सर्व इच्छांची पूर्तता होते. या दिवशी पूजा व्रत करण्याला फार महत्व आहे. चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. या पवित्र आणि विशेष दिवशी या कथेचं वाचन नक्की करा.

कामदा एकादशी व्रत कथा

कामदा एकादशीची कथा प्राचीन काळात भोगीपुर नावाच्या एका गावापासून सुरू होते. तिथं पुंडलिक नावाचा राजा राज्य करत होता. या गावात अनेक अप्सरा, किन्नर तसेच गंधर्व राहत असत. त्यापैकी ललित आणि ललिता यांच्यात प्रेम होतं. एकदा गंधर्व ललित राज दरबारात गाणं म्हणत होता. त्यावेळी त्याला पत्नी ललिताची आठवण आली. त्यामुळे लक्ष विचलीत होऊन त्याची लय आणि स्वर बिघडले.

हे कर्कट नावाच्या नागाने ओळखून राजाला सांगितलं. यामुळे रागात येऊन राजाने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. हजारो वर्ष ललित राक्षस योनीत फीरत राहिला. त्याच्या पत्नीला या गोष्टीने फार दुःख होत असे.

Kamada Ekadashi
Astro tips : रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावं? काय सांगतं शास्त्र!

काही काळाने फिरता फिरता ललिता विंध्य पर्वतावर राहणाऱ्या ऋष्यमूक ऋषिंच्या जवळ गेली. आणि आपल्या शापित पतीच्या मुक्तीचा मार्ग विचारू लागली. ऋषींना तिच्यावर दया आली. त्यांनी तिला चैत्र शुक्ल पक्षच्या कामदा एकादशीला व्रत करायला सांगितलं.

त्यांचा आशीर्वाद घेऊन तू परतली. तिने श्रद्धेने कामदा एकादशीचं व्रत केलं आणि त्यांंचा शाप दूर झाला व दोघे पुन्हा गंधर्व स्वरुपात आले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.