भारतामध्ये विविध देव-देवतांची अशी असंख्य मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास History निराळा आहे किंवा तिथल्या मूर्ती, बांधकाम आणि आख्यायिका निरनिराळ्या आहेत. असंच एक मंदिर मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरजवळच्या एका छोट्याश्या गावात आहे. Know about this Lord Hanuman temple in Madhya Pradesh Gwalior District
ग्वाल्हेर जिल्हयातील भिंड या गावामध्ये हनुमानाचं एक ५०० वर्ष जुनं मंदिर असून हे मंदिर डॉक्टर हनुमानाचं Lord Hanuman मंदिर म्हणून लोकप्रिय आहे. भक्तांचं रक्षण करणारा त्यांना विविध रोगांपासून किंवा आजारापासून मुक्ती देणारा मारुतीराया इथं थेट डॉक्टर अवतारातच विराजमान आहे. इथं अनेक भक्त Devotees त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी गर्दी करतात.
डॉक्टर हनुमानाचे आशिर्वाद घेतल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजारही दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या पुरातन मंदिरामध्ये हजारो भक्त त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी येत असतात. डॉक्टर हनुमान मंदिरारात मारुतीरायाची खास मूर्ती आहे. या मूर्तीच्या आणि मंदिराच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.
मारुतीराय असा बनला डॉक्टर
असं म्हटलं जात की शिवकुमार दास नावाच्या एका साधुला कॅन्सरचं निदान झालं होतं. हे साधू भिंड गावामध्ये असलेल्या या हमुमानाच्या मंदिरात मारुतीरायाचे आशिर्वाद घेण्यास गेले होते. यावेळी साधुला मारुतीरायाने डॉक्टरांच्या रुपात दर्शन दिलं. मारुतीरायाने डॉक्टरांचा पोशाख आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून साधूला दर्शन दिल्यानंतर त्यांचा कॅन्सर दूर होवून ते पूर्णपणे बरे झाले. तेव्हा पासून हे मंदीर डॉक्टर हनुमान मंदिर म्हणून ओळखलं जावू लागलं.
हे देखिल वाचा-
या मंदिरात येऊन डॉक्टर हनुमानाचे आशिर्वाद घेतल्याने सर्व आजार दूर होतात अशी इथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे. शिवाय मारुतीयाराचे हे मंदिर इथल्या मूर्तीमुळे देखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात मारुतीरायाची नृत्य स्वरुपातील प्रसन्न मुद्रा आहे. अशी मूर्ती असलेलं हे भारतातील एकमेव मंदीर आहे.
मंगळवारी हनुमानाचे आशिर्वाद घेण्यास गर्दी
खास करून मंगळवार आणि शनिवार हे दिवस हनुमानासाठी समर्पित असल्याने या दोन दिवशी या मंदिरात मोठ्या संख्याने भक्त येतात. डॉक्टर हनुमानाच्या मंदिरात भक्तांना विभूती दिली जाते. जिच्यामुळे अनेक रोग दूर होत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. खास करून मंदिराला ५ प्रदक्षिणा घातल्यास अल्सरस फोड किंवा कॅन्सर दूर होत असल्याचं म्हंटलं जातं.
खास करुन ज्या आजारांवर किंवा रोगांवर अद्याप उपचार उपलब्ध नाहीत अशा समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर हुनामानाचे आशिर्वाद घेतल्यास त्यांच्या समस्या दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. यासाठीच कोरोना काळामध्ये इथे हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी होम हवन करण्यात आले होते.
अनेक भक्त या मंदिरात नारळ देऊन नवस फेडण्यासाठी येतात. येणाऱ्या भक्तांसाठी इथं दुपार आणि संध्याकाळी भंडारा असतो. तसचं इथल्या गोशाळेत ३०० गायींची सेवा केली जाते.
टीप- ही माहिती सर्वसाधारण गृहितक आणि प्रचलित समजांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा हेतू नाही.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.