Ratha Saptami: रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही काही इतर नावे आहेत. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते.
पुराणात असा उल्लेख आहे की, अदिती आणि ऋषि कश्यप यांचा मुलगा सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते, सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे.
रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून, त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे.
कशी केली जाते पूजा:
या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करतात.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिला जातो. तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते.
महत्व:
ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे. माघ महिन्याच्या शुक्लपक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थ-स्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते, असे या पुराणांमध्ये सांगितले आहे. या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते. तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात.
मुहूर्त:
आज सूर्योदय ०७ वाजून १३ मिनिटांनी होणार आहे, आजच्या दिवशी संक्रातीपासून सुरू झालेले हळदीकुंकवाचे, बोरनान्हाचे अन् तीलवणाचे कार्यक्रम समाप्त होतील. रथसप्तमी हा या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.