Vastu Tips: चप्पल काढून घरात प्रवेश करणं का गरजेचं?, आरोग्य आणि आर्थिक समस्या होतील दूर

धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील घराबाहेर चपला काढणं अधिक योग्य ठरतं. अखेर चपला घराबाहेर का काढल्या जातात? त्याचे फायदे काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात
चपला घरात का नकोत
चपला घरात का नकोतEsakal
Updated on

भारतीय संस्कृतीमध्ये Indian Culture अशा अनेक परंपरा किंवा पद्धती आहेत ज्यामागे काहीन काही शास्त्रीय कारणं आहेत. यापैकीच एक म्हणजेच घरात प्रवेश करण्यापूर्वी चप्पला घराबाहेर काढणं. Know the reason why foot wares should be kept out of home Marathi Vastu Tips

भारतीय संस्कृतीमध्ये घराबाहेर आपली पादत्राणं Foot ware काढून घरात प्रवेश करण्याची परंपरा आहे. अलिकडे ही परंपरा बदलत असली तरी यामागे अनेक कारणं आहेत. वास्तूशास्त्रानुसार Vastu Shastra घराबाहेर चप्पल काढल्यानं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे.

धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील घराबाहेर चपला काढणं अधिक योग्य ठरतं. अखेर चपला घराबाहेर का काढल्या जातात? त्याचे फायदे काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

घराबाहेर चप्पल काढण्याचं वैज्ञानिक कारण

घरामध्ये बूट किंवा चप्पला घालून प्रवेश केल्याने त्यासोबत बाहेरील चपलांना चिकटलेली घाण घरामध्ये येईल. फरशीवर ही घाण चिकटल्याने त्याता आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे आजारांना निमंत्रण मिळू शकतं. खास करून घरामध्ये लहान मुलं किंवा वयोवृदद्ध असतील तर याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण चपलांसोबत अनेक किटाणू घरामध्ये प्रवेश करू शकतात.

हे देखिल वाचा-

चपला घरात का नकोत
April Fools' Day : कोल्हापुरी चप्पलच्या बाबतील तुम्हाला कोणी एप्रिल फुल तर करत नाही ना? असे ओळखा अस्सल कोल्हापुरी!

यासाठी घराबाहेर चप्पल काढावी

१.घराचे पावित्र्य राखण्यासाठी- हिंदू धर्मामध्ये घराला मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. ज्याप्रमाणे मंदिरात पादत्राणे काढून प्रवेश केला जातो. त्याचप्रमाणे घराचे पावित्र्य राखण्यासाठी चप्पल काढून घरात प्रवेश करणं योग्य मानलं जातं. घरात चप्पल काढल्याने घरातील वातावरण अशुद्ध होवू शकतं.

२. घरात आनंद टिकून राहतो- घराच चप्पल घालून आल्याने घरामध्ये चपलेसोबत नेगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते. यामुळे घराचं वातावरण बिघडू शकतं. यासाठी घराबाहेर चप्पला काढाव्या. यामुळे घरात आनंद टिकून राहिल आणि भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत.

३. दारासमोर चप्पला काढू नका- घराबाहेर चप्पला काढताना त्या योग्य ठिकाणी ठेवणंही गरजेचं आहे. चपला अगदी दारासमोर ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार मुख्यदारासमोर चप्पल काढू नये. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होण्यास बाधा निर्माण होऊ शकते.

४. चप्पल उलटी ठेवू नका- चप्पल कदीही उलटी ठेवू नये असं आपण अनेकदा घरातील वयो-वृद्धांकडून ऐकलं असेलच. चप्पल किंवा पादत्राणं उलटी ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते. यामुळे घरातील सुख-शांती भंग होऊ शकते.

चप्पल उलटी ठेवल्याने घरामध्ये कलह निर्माण होवू शकतो. तसचं धनलाभाचे मार्ग बंद होवून आर्थिक समस्या निर्माण होवू शकता.

५. चप्पल ठेवण्याची योग्य दिशा- अनेकदा घरी आल्यानंतर आपण चप्पला किंवा बूट कुठेही ठेवून देतो. तसचं घराबाहेरही अनेकदा चप्पला कशाही विखुरलेल्या असतात. मात्र यामुळे कुटुंबामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते. तसचं कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

वास्तू शास्त्रानुसार चप्पला उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नये. यामुळे घरातील सकारात्मकता कमी होवू लागते. चप्पला किंवा बूट कायम चपलांच्या कपाटात ठेवाव्या. हे कपाट दक्षिण किंवा पश्चिम असावं.

हे देखिल वाचा-

चपला घरात का नकोत
Kolhapuri Chappal: विषयच हार्ड! कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या 32 कारागिरांना GI प्रमाणपत्र; राष्ट्रीय स्तरावर मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()