Shree Ram Bow Name: श्रीरामाच्या धनुष्याचं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? या खास धनुष्याची लांबी आणि वजन ऐकून थक्क व्हाल

Ramayana Facts: श्रीरामांकडे देखील एक खास धनुष्य होतं. आजही आपण श्रीरामांची मंदिरातील प्रतिमा किंवा त्यांचा फोटो पाहिला तर त्यांच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या खांद्याला बाणांचा भाता दिसून येतो
shri ram bow name and specifications
shri ram bow name and specificationsEsakal
Updated on

Shree Ram Bow Name: भारताच्या प्राचीन इतिहासात अनेक धनुर्धरांचा उल्लेख आढळतो. महाभारतात अर्जुन, दुर्योधन आणि कर्ण यांच्या धुर्नुविद्येच्या अभ्यासाचा आणि त्यांच्या धुर्नविद्येच्या कौशल्याचा उल्लेख आढळतो. तर रामायणातही Ramayan श्रीरामांच्या धुर्नविद्येचं गुणगान ऐकायला मिळतं. Know what was the Name of the Bow Used by Lord ShriRam

हिदू देवदेवतांकडे Hindu Gods असलेल्या धनुष्यांची खास नावं होती आणि त्याप्रमाणे त्यांचं वैशिष्ट होतं. प्रत्येक देव देवतांच्या धनुष्यात चमत्कारीक ऊर्जा आणि शक्ती Power दडलेली होती. यातील विविध धुनष्यांचा पुराणांमध्ये उल्लेख आढळतो.

अर्जुनाला Arjun अग्निदेवतेकडून गाण्डिव धनुष्य प्रात्त झालं होतं. तर कर्णाकडे कोणत्याही शस्त्राने मोडलं जाणार नाही असं विजय धनुष्य होतं. तर भगवान श्रीकृष्णाकडे शिंगापासून तयार करण्यात आलेलं शारंग धनुष्य होतं.

याच प्रमाणे श्रीरामांकडे देखील एक खास धनुष्य होतं. आजही आपण श्रीरामांची मंदिरातील प्रतिमा किंवा त्यांचा फोटो पाहिला तर त्यांच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या खांद्याला बाणांचा भाता दिसून येतो.

श्रीरामाच्या धनुष्याचं नाव

श्रीरामाचं हे धुनुष्य देखील चमत्कारिक शक्ती असलेलं आणि खास वरदान प्राप्त झालेलं असं धुनष्य होतं. या धनुष्याचं नाव होतं. कोडंद. कोदंड म्हणजेच बांबू पासून तयार करण्यात आलेलं.

या धनुष्याच्या नावामुळेच श्रीराम यांना कोदंडधारी या नावाने देखील ओळखलं जातं. श्रीरामांनी आपले भाऊ राम आणि भरत यांच्यासोबत वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात धनुर्विद्या आत्मसात केली होती.

हे देखिल वाचा-

shri ram bow name and specifications
Ram Navami 2023 : रामायणातून शिका Financial Planing

श्रीरामाच्या कोदंड धनुष्याची वैशिष्ट्ये

श्रीरामांच्या कोदंड धनुष्याची खासियत म्हणजे हे धनुष्य त्याचं लक्ष्य भेदूनच पुन्हा माघारी येत असे. हे धनुष्य कधीच लक्ष्य चुकत नसे. श्रीराम जेव्हा लंकेसाठी निघाले होते. तेव्हा याच धनुष्याच्या मदतीने त्यांनी काही बाण समुद्रातील पाण्यात सोडले ज्यामुळे पाणी सुकण्यास मदत झाली अशी आख्यायिका आहे.

तसंच लंकेमध्ये जाण्यासाठी आड आलेल्या अनेक राक्षसांचा वध करण्यासाठी देखील श्रीरामाने याच धनुष्याचा उपयोग केला होता. श्रीरामांच्या या धनुष्याची आणखी एक खास बात म्हणजे श्रीरामांव्यतिरिक्त इतर कोणीही हे धनुष्य धारण करू शकतं नव्हतं.

कोदंड धनुष्याची लांबी आणि वजन

श्रीरामाच्या कोदंड धनुष्याची लांबी ही साडे पाच हात लांब असल्याचं पुराणात वर्णन आहे. तर या धुनष्याचं वजन तब्बल १०० किलो असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. श्रीरामाच्या या कोदंड धुनुष्याला देव धनुष्य असं ही म्हंटलं जातं.

पौराणिक कथा

श्रीराम देखील एक निष्णात धनुर्धर होते. पुराणातील एका कथेनुसार इंद्राचा पूत्र जयंतने अहंकारात श्रीरामाच्या शक्तीला आवाहन देण्यासाठी एका कावळ्याचं रूप धारण केलं.

कावळ्याचं रूप धारण केलेल्या या इंद्र पुत्राने सीतामातेच्या पायाला चोच मारून त्यांना जखमी केलं. सीतेच्या पायातून रक्त येत असल्याचं पाहताच श्रीरामांनी त्यांचं कोदंड धनुष्य उचलून कावळ्याला मारण्यासाठी बाण सोडला.

श्रीरामचं कोडंद अचूक लक्ष्य भेदत असल्याने कावळ्याच रुप धारणं केलेला जयंत मृत्यूच्या भितीने घाबरला. तो थेट पिता इंद्राकडे पोहचला. मात्र अहंकारात रामाला आवाहन दिल्याने जयंतला इंद्राने देखील आश्रय दिला नाही.

अखेर जयंतला कुणीच वाचवू न शकल्याने तो रामच्या चरणी शरण गेला आणि त्याने श्रीरामाची माफी मागितली. त्यानंतर श्रीरामांनी त्याला मोठ्या मनाने माफ देखील केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.