Kojagiri Pornima : कोजागिरी पौर्णिमेला आपल्या प्रियजणांना पाठवा हे हटके मॅसेज

कोजागिरी हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण
Kojagiri Pornima
Kojagiri Pornima esakal
Updated on

पुणे : कोजागिरी हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे.

Kojagiri Pornima
kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?

असं म्हणतात की, पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना ‘कोजागिरी…. हू जागिरी’ म्हणजे जागे आहात का ?, असे विचारत असते. म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध आणि गप्पा यांचा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल.

Kojagiri Pornima
Kojagiri Purnima 2022 : कोजागिरीला खीर खाण्याने होतात लाभ; बनवा ही खास ‘खीर’

कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला ‘शरद पौर्णिमा’, ‘माणिकेथारी’, ‘नवान्न पौर्णिमा’ , कौमुदी पौर्णिमा, ‘माडी पौर्णिमा’ असे देखील म्हणतात.

Kojagiri Pornima
Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

- आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

- चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Pornima
kojagiri purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व...

- मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

- आज कोजागिरी पौर्णिमा… आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri Pornima
kojagiri purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व...

- शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

- मंद प्रकाश चंद्राचा , त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढु दे,प्रकाश चंद्राचा, आस्वाद मसाले दुधाचा,आनंदाने साजरा करू सण..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.