दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सोसायटीतील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळत असतं. कोजागिरीला सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जागुन ही पौर्णिमा साजरा करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सामाजिक महत्व जाणून घेऊया...
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे. खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते असं मानलं जातं. या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी चंद्राच्या शातल प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यसाठी लाभदायक असते. कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते. यासाठी हा दिवस धन प्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात समृद्धी येण्यासाठी खूपच चांगला समजला जातो.
कोजागिरी पौर्णिमा आणि देवी लक्ष्मी दोघेही उज्ज्वल आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासाठी या रात्री जागून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असतो असे म्हणतात, म्हणून या दिवशी चंद्राचा प्रकाश अन्य दिवसांपेक्षा अधिक लख्ख असतो. याच्या शीतलतेमुळे चांगले आरोग्य लाभते. कोजागिरीच्या रात्री 12 वाजता घर झाडले तर वर्षेभर लक्ष्मी तुमच्या घरात वास करते अशी समज आहे.
कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व..
कोजागिरी पौर्णिमेला वर्षा ऋतूच्या समाप्तीसाठी प्रकृतीचे संकेतही मानला जातो. कोजागिरी पौर्णिमेचं येणं चतुर्मास संपल्याचे संकेत आहेत असे समजतात. आता धार्मिक अनुष्ठानाला महत्त्व देण्याचा काळ आहे. निसर्गाप्रमाणे शरीरातही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र स्थितीमध्ये असताना मोकळ्या जागेत बसावं. थंडगार मसाला दूध पिण्याची प्रथा सुरू झाली आहे.
कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष येतो आणि यात पितर पृथ्वीवर येतात. यावेळी पृथ्वीवर आलेल्या पितरांचे निवासस्थान चंद्रलोकात असते अशातच कोजागिरी पौर्णिमेच्या शीतलतेमुळे त्यांचा प्रवास सुखाचा होतो असा समज आहे. या तिथीला अनेक ठिकाणी नद्या किंवा कालव्यात दिवे सोडून पितरांना निरोप दिला जातो. नवरात्रीत अनेकजण कठोर तप करतात. या तपामुळे प्राप्त झालेली उर्जा त्यांच्या मस्तकात साठविली जाते. असं म्हणतात की मस्तकात साठवलेली उर्जा पूर्ण शरीरात प्रवाहित व्हावी यासाठी साधक कोजागिरी पौर्णिमेला पूजा पाठ करतात. त्यांची उर्जा सहज प्रवाहित करण्याची क्षमता चंद्राच्या शीतलतेमुळे प्राप्त होते आणि खीरीमुळे त्यांना शक्ती मिळते. यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजा करणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोजागिरीचे दुध पिण्याचा सल्ला दिला जातो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.