Krishnapingala Sankashti : आज कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी, या व्रताने उतरेल डोक्यावरच्या कर्जाचं ओझं

संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनाशिवाय अपूर्ण असतो.
Krishnapingala Sankashti
Krishnapingala Sankashtiesakal
Updated on

Krishnapingala Sankashti Chaturthi 2023 Mahatwa : सनातन हिंदू धर्मात गणेशाची उपासना विशेष फलदायी मानली जाते. गणेशाला प्रझम पूजनीय मानले जाते. गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाहीय. विग्घहर्ता गणरायाच्या पूजेसाठी चतुर्थीचा दिवस विशेष शुभ मानला जातो.

कृष्णपिंगळचतुर्थी ही आषाढ महिन्यातल्या कृष्ण पक्षातली संकष्टी चतुर्थी असते. या व्रताला खास महत्व आहे. जाणून घेऊया.

असं मानलं जातं की, संकष्टीचं व्रत चंद्राची दर्शन, पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही.

कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी व्रत मुहूर्त

पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातली कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी आज ७ जून २०२३ रोजी दूपारी १२ वाजून ५० मिनीटांनी सुरू होणार असून रात्री ९ वाजून ५० मिनीटांपर्यंत याचा शुभ मुहूर्त आहे.

चंद्रोदय वेळ

पंचांगानसार या वर्षी कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ नाही. या दिवशी चंद्र रात्री १० वाजून ५० मिनीटांनी उगवेल परंतु तिथी, मुहूर्त केवळ ९ वाजून ५० मिनीटांपर्यंतच आहे. त्यानंतर पंचमी तिथी सुरू होत आहे.

Krishnapingala Sankashti
Vinayaki Chaturthi : दगडूशेठ गणपतीला शेषनागाची पुष्पसजावट, बघा फोटो

कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थी महत्व

धार्मिक शास्त्रानुसार कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रत्येक कार्यात यश मिळवण्यासठी अतुलनीय मानले गेले आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती या दिवशी व्रत ठेवतो त्याच्या अपत्याशी संबंधित समस्या दूर होतात. बदनामी व निंदा यांचे योग नाहिसे होतात. सर्व प्रकारच्या कामातील अडथळे दूर होतात. पैसा आणि कर्जाशी संबंधित समस्या सुटतील. या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण केल्याने घर खरेदीची इच्छा पूर्ण होते.

Krishnapingala Sankashti
Sankashti Chaturthi 2023 : 'या' राशींसाठी संकष्टी चतुर्थी ठरणार लाभदायक

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.