Kunkumarchan : नवरात्रीत केला जाणारा कुंकूमार्चन अभिषेक नेमका काय ? असा केला जातो विधी

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्या पर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.
Kunkumarchan
Kunkumarchan esakal
Updated on

Kunkumarchan : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हांडांनी एक्स (ट्विटर) वर ट्विट करत कुंकुमार्चनचा उल्लेख केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आलाय. आता कुंकुमार्चन म्हणजे काय? कुंकुमार्चन करण्याचा योग्य विधी काय? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील पायापासून डोक्यापर्यंत १०८ वेळेस वाहिल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्या पर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र या गोष्टींचा वापर करावा.

Kunkumarchan
Navratri Travel : भारतात आहे दुर्गामातेचे शापित मंदिर; ओस पडलेल्या मंदिरात जायला घाबरतात भक्त!

कुंकुमार्चन कधी करावे?

● अष्टमी ,चतुर्दशी, पौर्णिमा ,नवरात्र ,लक्ष्मीपूजन ,

● मंगळवार ,शुक्रवार, पोर्णिमा गुरु पुष्यामृत योग या दिवशी

● कुंकुमार्चन अवश्य करावे,अमावस्येला कुंकुमार्चन करु नये.

● आश्विन नवरात्रात सप्तशती चे पाठ वाचण्या पूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे

Kunkumarchan
Navratri 2022: लोणारच्या कमळजा देवी मंदिराचा काय आहे इतिहास?

कुंकुमार्चन करतांना कोणती काळजी घ्यावी ?

कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच अंगठा ,मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकु घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वहावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा. हे कुंकू कोरडे असावे.

Kunkumarchan
Navratri Recipe: केळीचा रायता कसा तयार करायचा ?

कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे?

कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. 

Kunkumarchan
Navratri 2023 : मालेगावी नवरात्र उत्सवात 5 लाख टिपऱ्यांची विक्री

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत भरून ठेवावे. कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.