Maturity Definition By Sri Sri Ravishankar : जगाला आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवणारे, आयुष्याच्या आनंदाच्या वाटेवर मार्गदर्शन करणारे श्री श्री रविशंकर हे अध्यात्मिक गुरू म्हणून सर्वांनाच माहित आहेत. त्यांचे अनेक उपदेश लोकांना जीवनाची योग्य वाट दाखवतात.
अशाचप्रकारे त्यांनी समजदारी (मॅच्युरीटी) कशाला म्हणावी याची एक सोपी व्याख्या सांगितली आहे. ज्यामुळे प्रत्येकाच्याच जीवनाला एक वेगळे वळण आणि यशाची नवी दिशा मिळेल. जाणून घेऊया.
श्री श्री रविशंकर म्हणतात, जे लोक चुकांकडे फक्त चूक म्हणून बघत नाहीत ते फार खास असतात. जर तुम्ही कोणती नवी चूक करतात तेव्हा जर ती नकळत घडलेली असेल तर त्यातून तुम्हाला असा धडा मिळतो की, तो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवतात. पण जर तिच चूक तुम्ही वारंवार करत असाल तर तुमच्या या चुकीला माफी नाही.
जेव्हा तुम्ही चूक करतात तेव्हा आज नाही तर उद्या तुम्हाला त्याची फळं भोगावीच लागतात. त्यामुळे जाणूनबुजून चूका करणं नक्कीच योग्य नाही. चूक ती असते ज्यातून तुम्ही काहीतरी धडा घेतात. पण जर तेच तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल तर हे सुज्ञ, मॅच्युअर्ड व्यक्तीचं लक्षण नाही. जी चूक झाली त्यावेळच्या घटनेतून, परिस्थितीतून धडा घेणे, काहीतरी शिकणे गरजेचे असते.
स्वतःची चूक ओळखणे कठीण असते., पण जर तुम्हाला ती समजत असेल तर तुम्ही नक्कीच इतरांच्या माफीच्या लायक आहात. पण जर तुम्ही तुमची चूक स्वीकारली नाही तर तुमचं मनच तुम्हाला खात राहील. त्यामुळे स्वतःच्या चूकांचं समर्थन करण्याऐवजी त्या पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःवर काम केले तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकाल.
जेव्हा तुम्ही इतरांच्या चुका दाखवतात तेव्हा तुम्ही कसे वागतात याचेही निरीक्षण करायला हवे. जर तुम्ही विनाकारण त्यांचे मन दुखवून स्वतःला सुखावत असाल तर तुम्हीही चूकच करत आहात हे लक्षात घ्यायला हवं. चूक सुधारली जाईल अशाच पद्धतीने सांगितली जायला हवी.
कोण असतो मॅच्युअर्ड व्यक्ती?
कोणताही मॅच्युअर्ड व्यक्ती त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करत नाही. एकदाच झालेल्या चुकीतून शिकतो आणि पुन्हा अशी चूक न होऊ देण्याचा पण करतो. त्यामुळे मॅच्युअर्ड व्यक्ती तोच असतो जो इतरांच्या चुकांतूनही स्वतः धडा घेतो आणि शहाणा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.