Marathi Abhijat Bhasha: भारतातली सर्वात प्राचीन भाषा कोणती? 'या' दोन भाषांमध्ये हजारो वर्षांपासून आहे संघर्ष

Tamil language: साधारपणे जिवंत असलेल्या भाषांपैकी तमिळ हीच सर्वात प्राचीन आणि लिखित परंपरेत कायम असलेली भाषा आहे. परंतु संस्कृत जगातली सगळ्यात जुनी भाषा असल्याची मान्यता असल्याचं सांगितलं जातं.
Marathi Abhijat Bhasha: भारतातली सर्वात प्राचीन भाषा कोणती? 'या' दोन भाषांमध्ये हजारो वर्षांपासून आहे संघर्ष
Updated on

Marathi Classical Language: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या अनेक दशकांपासून मराठी मनाची ही मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. परंतु भारतामध्ये सर्वात प्राचीन भाषा कोणती आहे, हे तुम्हाला माहितंय का? मीच प्राचीन, असं सांगणाऱ्या दोन भाषा हजारो वर्षांपासून एकमेकींशी संघर्ष करीत आहेत. त्याबद्दल पाहूया.

भारतामध्ये संस्कृत आणि तमिळ या दोन सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. परंतु या दोहींमध्ये कोणती भाषा सर्वात प्राचीन? यावरुन कायम संघर्ष झालेला आहे. तमिळ भाषेचे २ हजार ३०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज उपलब्ध आहेत. या भाषेचं सगळ्यात जुनं लिखित रेकॉर्ड तिसऱ्या शतकात असल्याचं मानलं जातं.

दुसरीकडे इंडो-आर्यन भाषा असलेल्या संस्कृतला सर्वात जुनी भाषा असल्याचं मानलं जातं. त्यानंतर पुढे इतर भाषांचा विकास झाला, असं काही अभ्यासक सांगतात. संस्कृत भाषेचे ३ हजार ५०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज उपलब्ध आहेत. संस्कृतचे सर्वात प्राचीन अभिलेख वेदांमध्ये सापडतात. मुळात तमिळ आणि संस्कृत ह्या भारतातल्या सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत, या दुमत नाही. 'आज तक'ने यासंदर्भातील रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

वियॉनच्या रिपोर्टनुसार, साधारपणे जिवंत असलेल्या भाषांपैकी तमिळ हीच सर्वात प्राचीन आणि लिखित परंपरेत कायम असलेली भाषा आहे. परंतु संस्कृत जगातली सगळ्यात जुनी भाषा असल्याची मान्यता असल्याचं सांगितलं जातं.

हे मुद्दे आहेत महत्त्वाचे...

१. तमिळ ही एक द्रविड भाषा आहे. ही भाषा भारतातल्या तमिळनाडू राज्यासह श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियामध्ये बोलली जाते.

संस्कृत ही एक प्राचीन इंडो-आर्यन भाषा आहे. भारतातल्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृकडे बघितलं जातं.

२. तमिळ ही जगातली सगळ्या जुनी जिवंत शास्त्रीय भाषांपैकी एक समजली जाते. तमिळ भाषेचे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त दस्तावेज आहेत.

संस्कृत भाषेचे ३ हजार ५०० वर्षांपेक्षा जास्त जुने दस्तावेज आहेत. यामध्ये वेदांचे सर्वात जुने लिखित अभिलेख आहेत. या प्राचीन हिंदू ग्रंथांचा इतिहास दीड हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचा आहे.

३. तमिळ साहित्य परंपरेला सर्वात समृद्ध समजलं जातं. ज्यात भारतीय संस्कृती आणि साहित्याच्या विकासासाठी मोठं योगदान देण्यात आलेलं आहे.

संस्कृत भाषेची शब्दावली समृद्ध आहे. भाषेचं व्याकरण जटिल असून भाषा समजण्यास अवघड आहे.

४. तमिळ लिपी ही जगातल्या सगळ्यात जटिल लेखन प्रणालींपैकी एक आहे. त्यातले वर्ण आणि प्रतिकांना वेगळ्या पद्धतीने सेट करण्यात आलेले आहे.

संस्कृत भाषेमुळे हिंदी, बंगाली आणि मराठीसह अनेक भाषांना विकास साधता आला.

५. तमिळ ही जगातली अशी एकमेव भाषा आहे, जिचे पाच ज्ञानकोश आहेत.

संस्कृत भाषा मुख्यतः हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळून येते. तसेच प्राचीन भारतीय साहित्य आणि दार्शनिक ग्रंथांमध्ये भाषेचा प्रयोग करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.