Festival 2022 : सेव्ह सेलिब्रेशन डेट्स! वर्षभरातील मराठमोळ्या सणांची संपूर्ण यादी

Festival 2022 : सेव्ह सेलिब्रेशन डेट्स! वर्षभरातील मराठमोळ्या सणांची संपूर्ण यादी
Updated on

नवीन वर्षात म्हणजे २०२२ला New Year 2022)सुरूवात झाली आहे. आज १ जानेवारीपासून २०२२ (1st January) चा शुभारंभ झाला. नवीन वर्षासोबत नवीन आशा, नवीन चैतन्य आणि सणांचा उत्साह (Fast And Festivals) सुरू होईल. नवीन वर्षात सुरु होताच मकरसंक्रात होळी, वसंत पंचमी, नवरात्री, महाशिवरात्री, श्रावण, विजयादशमी, धनतेरस दिवाळी भाऊबीज अशा मराठमोळ्या सणांची (Marathi festival list in 2022) वाट पाहण्यास सुरूवात होते. एकादशी, पोर्णिमा, अमवास्या, चतुर्थी सारखे महत्त्वपूर्ण दिवशी उपवास केले जातात. चला तर मग जाणून घेऊ २०२२मध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये हे उपवास, सण केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात येणार आहे,

नवीन वर्ष 2022 उपवास आणि सणांची यादी

जानेवारी २०२२ सण ( January Festival 2022)

  • 01 जानेवारी, शनिवार: ख्रिस्ती नवीन वर्ष प्रारंभ, नवीन वर्ष 2022 चा पहिला दिवस.

  • 02 जानेवारी, रविवार: मार्गशिर्ष अमावस्या

  • 03 जानेवारी , सोमवर : पौष मास प्रारंभ

  • 06 जानेवारी, गुरुवार: विनायक चतुर्थी

  • 09 जानेवारी, रविवार: गुरु गोविंद सिंग जयंती

  • 12 जानेवारी, बुधवार: स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तारखेप्रमाणे)

  • 13 जानेवारी, गुरुवार: पौष पुत्रदा एकादशी, भोगी

  • 14 जानेवारी, शुक्रवार: मकर संक्रांती, उत्तरायण, लोहरी, पोंगल,

  • 15 जानेवारी, शनिवार: किंक्रात, महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी

  • 17 जानेवारी, सोमवार: पौष पौर्णिमा, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती (तिथीप्रमाणे)

  • 21 जानेवारी, शुक्रवार: संकष्टी चतुर्थी

  • 26 जानेवारी : गणराज्य दिन

  • 28 जानेवारी, शुक्रवार: एकादशी

  • 31 जानेवारी सोमवार : मौनी अमावस्या

फेब्रुवारी 2022 सण (February 2022 Festival)

  • 02 फेब्रुवारी, बुधवार : माघ मास प्रारंभ

  • 04 फेब्रुवारी, गुरुवार : श्री गणेश जयंती. विनायक चतुर्थी

  • 05 फेब्रुवारी, शनिवार: वसंत पंचमी

  • 07 फेब्रुवारी, सोमवार: रथ सप्तमी

  • 12 फेब्रुवारी, शनिवार: जया एकादशी

  • 16 फेब्रुवारी, बुधवार: माघ पौर्णिमा

  • 19 फेब्रुवारी शनिवार : छत्रपती शिवाजी महाराज जयंती

  • 20 फेब्रुवारी रविवार : संकष्टी चतुर्थी

  • 27 फेब्रुवारी, रविवार: विजया एकादशी, मराठी राजभाषा दिन

मार्च 2022 सण (March 2020 Festival)

  • 01 मार्च, मंगळवार: महाशिवरात्री,

  • 02 मार्च, बुधवार: दर्श अमावस्या

  • 03 मार्च गुरुवार :फाल्गून मासारंभ

  • 06 मार्च रविवार : विनायक चतुर्थी

  • 08 मार्च मंगळवार : जागतिक महिला दिन

  • 14 मार्च, सोमवार: अमलकी एकादशी

  • 17 मार्च, गुरुवार: फाल्गुन पौर्णिमा, होळी

  • 18 मार्च, शुक्रवार: होळी, धुलिवंदन

  • 19 मार्च, शनिवार : वसंतोत्सव प्रारंभ

  • 20 मार्च, रविवार : तुकाराम बीज

  • 21 मार्च, सोमवार: संकष्टी चतुर्थी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)

  • 22 मार्च, मंगळवार : रंगपंचमी

  • 31 मार्च, गुरुवार: दर्श अमावस्या

एप्रिल 2022 सण (April 2022 Festival)

  • 01 एप्रिल, शुक्रवार: चैत्र अमावस्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

  • 02 एप्रिल, शनिवार: चैत्र मास प्रारंभ, नवरात्री प्रारंभ, घटस्थापना, गुढीपाडवा

  • 04 एप्रिल, सोमवार : गौरी तृतीया(तीज) गणगौर, गौरीपूजा

  • 05 एप्रिल, विनायक चतुर्थी

  • 10 एप्रिल, रविवार: राम नवमी

  • 12 एप्रिल, मंगळवार: कामदा एकादशी

  • 15 एप्रिल, शुक्रवार : गुड फ्रायडे

  • 16 एप्रिल, शनिवार: चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

  • 17 एप्रिल, रविवरा : ईस्टर संडे

  • 19 एप्रिल, मंगळवार: अंगारक संकष्टी चतुर्थी

  • 26 एप्रिल, मंगळवार: वरुथिनी एकादशी

  • 28 एप्रिल, गुरुवार: प्रदोष व्रत

  • 29 एप्रिल, शुक्रवार: मासिक शिवरात्री

  • 30 एप्रिल, शनिवार: वैशाख अमावस्या

मे 2022 सण (May 2022 Festival)

  • 01 मे, रविवार: सूर्यग्रहण, महाराष्ट्र दिन, आतंरराष्ट्रीक कामगार दिन

  • 03 मे, मंगळवार: अक्षय तृतीया, परशुराम जयंती, रमजान ईद

  • 04 मे, बुधवार : विनायक चतुर्थी

  • 10 मे, मंगळवार: सीता नवमी

  • १२ मे, गुरुवार: मोहिनी एकादशी

  • 14 मे, शनिवार: नरसिंह जयंती

  • 15 मे, रविवार: वैशाख पौर्णिमा,

  • 16 मे, सोमवार: बुद्ध पौर्णिमा, खग्रास चंद्रग्रहण

  • 19 मे, गुरुवार: संकष्टी चतुर्थी

  • 26 मे, गुरुवार: अपरा एकादशी

  • ३० मे, सोमवार: ज्येष्ठ अमावस्या

जून 2022 सण (June 2022 Festival)

  • 03 जून: शुक्रवार: विनायक चतुर्थी

  • 06 जून, सोमवार : राज्यभिषेक सोहळा(रायगड)

  • 10 जून, शुक्रवार: निर्जला एकादशी

  • 11 जून, शनिवार : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथी प्रमाणे)

  • 12 जून, रविवार : शिवराज्यभिषेकत्सव

  • 13 जून, सोमवार : पोर्णिमा प्रारंभ

  • 14 जून, मंगळवार: वट पौर्णिमा व्रत

  • 17 जून, शुक्रवार: संकष्टी चतुर्थी, राजमाता जिजाऊ भोसले पुण्यतिथी(तारखे प्रमाणे)

  • 22 जून, बुधवार: योगिनी एकादशी, (राजमाता जिजाऊ भोसले पुण्यतिथी(तिथी प्रमाणे)

  • 26 जून, रविवार: छत्रपती शाहू महाराज जयंती

  • 29 जून, बुधवार: आषाढ अमावस्या

  • 30 जून, गुरुवार: गुरुपुष्यमृत योग

जुलै 2022 सण (July 2022 festival)

  • 01 जुलै, शुक्रवार: जगन्नाथ रथयात्रा

  • 03 जुलै : रविवार : विनायक चतुर्थी

  • 10 जुलै, रविवार: देवशयनी आषाढी एकादशी, बकरी ईद

  • 13 जुलै, बुधवार: गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा

  • 16 जुलै, शनिवार: संकष्टी चतुर्थी,

  • 24 जुलै, रविवार: कामिका एकादशी

  • 28 जुलै, गुरुवार: श्रावण अमावस्या

  • 29 जुलै, शुक्रवारी : श्रावण मासारंभ

ऑगस्ट 2022 उपवास आणि सण

  • 01 ऑगस्ट, सोमवार: विनायक चतुर्थी

  • 02 ऑगस्ट, मंगळवार: नागपंचमी, मंगळागौरी पुजन

  • 08 ऑगस्ट, सोमवार: श्रावण पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार

  • 09 ऑगस्ट, मंगळवार: मोहरम

  • 11 ऑगस्ट, गुरुवार: रक्षा बंधन, राखी, नारळी पोर्णिमा

  • 14 ऑगस्ट, रविवार: काजरी तीज

  • 15 ऑगस्ट, सोमवार: संकष्ट चतुर्थी, स्वातंत्र दिन, पतेती

  • 16 ऑगस्ट, मंगळवार : मंगळागौरी पुजन, पारशी नुतवर्ष सन

  • 19 ऑगस्ट, शुक्रवार: श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला

  • 23 ऑगस्ट, मंगळवार: भागवत एकादशी, मंगळागौरी पुजन

  • 26 ऑगस्ट, शुक्रवार : पोळा

  • 27 ऑगस्ट, शनिवार: भाद्रपद अमावस्या

  • 28 ऑगस्ट रविवार : भाद्रपद प्रारंभ

  • 30 ऑगस्ट, मंगळवार: तीज, हरतालिका तृतीया

  • 31 ऑगस्ट, बुधवार: गणेश चतुर्थी

सप्टेंबर 2022 सण (September 2022 Festival)

  • 01 सप्टेंबर, गुरुवार: ऋषी पंचमी

  • 03 सप्टेंबर, सोमवार: जेष्ठागौरी आवाहन

  • 04 सप्टेंबर, रविवार: जेष्ठागौरी पुजन

  • 05 सप्टेंबर,सोमवार: जेष्ठागौरी विरर्जन

  • 06 सप्टेंबर, मंगळवार: परिवर्तिनी एकादशी

  • 09 सप्टेंबर, शुक्रवार: अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन

  • 10 सप्टेंबर, शनिवार: भाद्रपद पौर्णिमा व्रत, पितृ पक्ष सुरू होत आहे

  • 13 सप्टेंबर, मंगळवार: अंगारक संकष्टी चतुर्थी

  • 21 सप्टेंबर, बुधवार: इंदिरा एकादशी

  • 25 सप्टेंबर, रविवार: अश्विन अमावस्या, सर्वपितृ अमावस्या

  • 26 सप्टेंबर, सोमवार: अश्विन प्रारंभ, शरद ऋतूतील नवरात्री, घटस्थापना किंवा कलश स्थापना

ऑक्टोबर 2022 चे सण (Festival of October 2022)

  • 02 ऑक्टोबर, रविवारी: महात्मा गांधीॉ

  • 05 ऑक्टोबर, बुधवार: दुर्गा विसर्जन, दसरा, विजयादशमी, रावणाच्या मूर्तीचे दहन

  • 06 ऑक्टोबर, गुरुवार: पाशांकुशा एकादशी

  • 09 रविवार, ऑक्टोबर: अश्विन पौर्णिमा व्रत, कोजागर पौर्णिमा व्रत, शरद पौर्णिमा, इद- ए मिलाद

  • 13 ऑक्टोबर, गुरुवार: संकष्टी चतुर्थी व्रत, करवा चौथ

  • 21 ऑक्टोबर, शुक्रवार: रमा एकादशी

  • 22 ऑक्टोबर, शनिवार: धनत्रयोदशी

  • 24 ऑक्टोबर, सोमवार: दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजा

  • 25 ऑक्टोबर, मंगळवार: कार्तिक अमावस्या, खंडग्रास सूर्यग्रहण

  • 26 ऑक्टोबर, बुधवार: बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा भाई दूज, गोवर्धन पूजा,

  • 28 ऑक्टोबर, शुक्रवार : विनायक चतुर्थी

  • 30ऑक्टोबर रविवार: छठ पूजा

नोव्हेंबर 2022 सण (November 2022 Festival)

  • 04 नोव्हेंबर, शुक्रवार: प्रबोधनी एकादशी

  • 05 नोव्हेंबर, शनिवार: , तुळशी विवाह

  • 08 नोव्हेंबर, मंगळवार: कार्तिक पौर्णिमा, खग्रास चंद्रग्रहण, गुरु नानक जंयती

  • 12 नोव्हेंबर, शनिवार: संकष्टी चतुर्थी

  • 16 नोव्हेंबर, बुधवार: काल भैरव जयंती

  • 20 नोव्हेंबर, रविवार: उत्पत्ती एकादशी

  • 23 नोव्हेंबर,बुधवार: मार्गशीर्ष अमावस्या

  • 24 नोव्हेंबर, गुरूवार : मार्गशीर्ष मासारंभ

  • 28 नोव्हेंबर,रविवार : विनायक चतुर्थी

डिसेंबर 2022 चे सण (festivals of December 2022)

  • 03 डिसेंबर, शनिवार: मोक्षदा एकादशी, गीता जयंती

  • 07 डिसेंबर, बुधवार: श्री दत्त जयंती

  • 08 डिसेंबर, गुरुवार: मार्गशीर्ष पौर्णिमा

  • 11 डिसेंबर, रविवार: संकष्टी चतुर्थी

  • 19 डिसेंबर, सोमवार: सफला एकादशी

  • 23 डिसेंबर, शुक्रवार: पौष अमावस्या

  • 25 डिसेंबर, रविवार : ख्रिसमस, नाताळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.