अनेकजण घर House बांधत असताना ते दोन मजली बांधतात किंवा घरावर गच्ची ठेवली जाते. अशावेळी अनेकदा घरातूनच जिना Staircase तयार केला जातो. तर काहीवेळा वर-खाली खोल्या असल्याने एखाद्या खोलीत जाण्यासाठी घरात पायऱ्या तयार करण्याची गरज भासते. Marathi Vastu Tips what should be the exact location of staircase in your home
घरातुन वळणारा जिना काढणं किंवा काही ठिकाणी सुंदर पायऱ्या तयार करणं यामुळे घराला शोभा येत असली तरी काही वेळा ते नुकसानदायक ठरू शकतं. वास्तू शास्त्रानुसार Vastu Shastra घरातील जिना किंवा पायऱ्या चुकीच्या दिशेला असल्यास त्याचे नकारात्मक परिणाम Negativity होऊ शकतो. यासाठीच जिना तयार करण्यापूर्वीच त्याची योग्य दिशा ठरवणं गरजेचं आहे.
वास्तू शास्त्रानुसार घरातील पूर्व दिशेला कधीही पायऱ्या असू नयेत. पूर्व दिशेला पायऱ्या किंवा जिना असल्यास त्याचा घरातील सुख-शांतीवर तसचं घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पूर्व दिशेला पाय़ऱ्या असल्यास येतील अडचणी
वास्तूशास्त्रानुसार घराच्या पुर्व दिशेस पायऱ्या किंवा जिना असेल तर कुटुंबातील लोकांना काही अडचणींचा समना करावा लागू शकतो. यात अनेकदा चांगल्या संधी हातातून निसटतात. तसचं कुटुंबातील व्यक्तींना हृदयासंबधीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. घरातील जिना पूर्व, आग्नेय, ईशान्य किंवा उत्तरेला असणार नाही याची काळजी घ्यावी.
हे देखिल वाचा-
ईशान्य कोनातही जिना नसावा
घराच्या ईशान्येस जीना असेल तर व्यवसायात नुकसान सोसावं लागू शकतं. तसचं आरोग्याच्या अडचणी निर्माण होवून स्वास्थ्य बिघडतं. वास्तूशास्त्रानुसार उत्तर-पूर्व दिशा तसचं ईशान्येला देव-देवतांचा वास असतो. त्यामुळे इथं जिना नसावा.
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला जिना बनवणं चांगलं मानलं जातं.
घरातील जिना तयार करताना घ्या या गोष्टींची काळजी
वास्तूशास्त्रानुसार जिन्याच्या पाढऱ्यांची संख्या ही विषम असावी. १७ पायऱ्या असणं शुभ मानलं जातं.
पायऱ्या किंवा जिना वळणदार नसावा.
जिन्याखाली किचन, बाथरूम किंवा शूज स्टॅण्ड नसावं, नाहीतर वास्तूदोष निर्माण होवू शकतो.
जिना चुकीच्या ठिकाणी असल्याने वास्तू दोष निर्माण झाला असेल तर भिंतीवर स्वास्तिक चिन्ह काढावं.
तसचं पायऱ्यांजवळ तुळशीचं रोप ठेवल्यानेही वास्तू दोष दूर होण्यास मदत होते.
घरात कोणताही वास्तू दोष निर्माण होवू नये यासाठी घरं बांधताना जिना योग्य दिशेला असेल याची काळजी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.