Margashirsh Month 2022 : मार्गशीर्ष महिन्यात करा शंखाचे हे उपाय; लक्ष्मी देवी कधीही रुसणार नाही

मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित
Margashirsh Month 2022
Margashirsh Month 2022esakal
Updated on

Margashirsh Month 2022 : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. कार्तिक महिन्यानंतरचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे.

Margashirsh Month 2022
Pride Month 2022: जूनमध्ये LGBTQ समुदाय प्राइड परेड का साजरा करतो?

हिंदू धर्मात, प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. कार्तिक महिना तुळशी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. त्याचप्रमाणे कार्तिक नंतर येणारा मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान श्री कृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होते.

Margashirsh Month 2022
November Month Horoscope: आजपासून 'या' राशींचे दिवस पालटणार; नवा महिना व्यवसाय अन् करियरसाठी शुभ

मार्गशीर्ष हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील नववा महिना आहे. २३ नोव्हेंबरला अमावस्येनंतर २४ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात शंखपूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात शंखपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हणतात.

Margashirsh Month 2022
ICC Player Of Month Awards : श्रेयस मिताली अन् दीप्ती शर्यतीत

धनप्राप्तीसाठी शंखाचे हे उपाय करा

मार्गशीर्ष महिना सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. यापैकी कोणताही उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होईल आणि घरामध्ये पैशांचा पाऊस पडू लागेल.

- या महिन्यात दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध भरावे आणि याने भगवान विष्णूला अभिषेक करावा याने धनाची प्राप्ती होते.

Margashirsh Month 2022
Nanded : शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

- या महिन्यात केव्हाही मोती शंखात तांदूळ भरून गुंडाळी बनवा आणि तिजोरीत ठेवा.

- असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात विष्णू मंदिरात शंख दान केल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.

- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून अभिषेक केल्याने संपत्तीचा वर्षाव होतो.

Margashirsh Month 2022
Nanded : ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्यांनी व्यक्त केल्या भावना

- मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुख-समृद्धीची उणीव होत नाही.

- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र दोषामुळे धन येत नसेल तर पांढरा शंख, तांदूळ, बत्ताशे पांढर्‍या रंगाच्या कपड्यात गुंडाळून नदीत टाकून द्या. हा उपाय खूप चमत्कारिक आहे. तुम्ही असे केल्यावर तुमचे दिवस बदलतील.

Disclaimer: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. योग्य इलाजासाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.