Margashirsha Vrat : यंदा मार्गशीर्षात अमावस्यायुक्त गुरुवार, महालक्ष्मी व्रत करावे का? धर्म अभ्यासक सांगतात

Margashirsha Guruvar Vrat
Margashirsha Guruvar Vratesakal
Updated on

Margashirsha Guruvar Vrat : व्रत वैकल्यांचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. या महिन्यात महालक्ष्मी व्रतांची सुरुवात होते. महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्षातील चारही गुरुवारी स्त्रीया मनोभावे पुर्ण करतात. यंदाचा योगायोग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात देखील गुरुवार पासून होत आहे. मात्र यंदांच्या मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार येत आहेत. त्यामुळे गुरुवारचे व्रत हे 4 गुरुवार करावे की 5 गुरूवार असा संभ्रम निर्माण झाला आहे. चला तर यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे यांच्याकडून उपाय जाणून घेऊया.

Margashirsha Guruvar Vrat
Shanidev Upay: शनिवारी हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल; सुखसमृद्धी अन् धनवाढही होईल

सुख- शांती देणारे गुरुवार व्रत

पं. नरेंद्र धारणे सांगतात, कुटुंबात सुख- शांती नांदावी, दुःख, रोगांचा नाश व्हावा अन् धन- धान्याची संपन्नता लाभावी यासाठी स्त्रीया या महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मीची मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा करतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरूवार करावे? यासह शेवटचा गुरुवार अमावास्यायुक्त असल्याने या दिवश व्रत करावे का?

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Margashirsha Guruvar Vrat
Astro Tips For Sleep : रोज झोपेचं खोबरं होतंय; वास्तूशास्त्रातील हे उपाय करतील शांत झोपायला मदत
Lakshami Vrat Pujan
Lakshami Vrat Pujanesakal

मात्र धर्मसिंधू आणि निर्णयसिंधु ग्रंथानुसार अमावस्यायुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो. त्यामुळे या दिवशी उपवास करावे यासह नित्य नियमानुसार व्रत पुर्ण करावे. यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही. याउलट मार्गशीर्षात देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने भक्तीभावाने पुजन करावे.

Margashirsha Guruvar Vrat
Vivah Muhurat 2022: यंदा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लग्नासाठी हे 8 शुभ मुहूर्त; जाणून घ्या तारीख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.