Margashirsh Mass 2022 : मार्गशीर्षात करा ही व्रत- वैकल्ये; दुःखांचा होईल अंत अन् लाभेल सुख- संपत्ती

Lakshami Vrat Pujan
Lakshami Vrat Pujanesakal
Updated on

Margashirsh Mass 2022 : मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत महत्त्वपुर्ण मानला जातो. हा महिना भगवान श्रीविष्णूंना अर्पण करण्यात आला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो. यासह मार्गशीर्ष महिना हा व्रत- वैकल्यांचा महिना मानला जातो. याकाळात मोठ्या भक्ती- भावाने व्रत- वैकल्ये केली जातात. अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात किती प्रकारचे व्रत केले जातात यासह या महिन्यात काय करावे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

महत्त्व मार्गशीर्षाचे!

भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्व भगवद् गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'मसानां मार्गशीर्षोहं' अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे. भगवान श्रीविष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पुजा केल्याने अगणित पूण्य प्राप्ती होते.

Lakshami Vrat Pujan
Spiritual Facts : नक्षत्र म्हणजे काय?

यासह या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ, भगवद् गीतेचे पारायण करावे. मार्गशीर्षातील गंगास्नानाचे पुण्य हे दहा लाख ग्रहण स्नानाएवढे मानले जाते.

सृष्टीची उत्पत्ती हि शीर्ष मार्गाने होते. म्हणजेच अर्भक हे खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत जन्मास येते. अध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते. गुरूचा अनुग्रह (गुरुमुखातून नाम मिळाल्यानंतर) मिळाल्यानंतर हे शीर्ष ऊर्ध्व होते. शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो.

मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नेतेसाठी गुरवारचे व्रत अन् उपवास केले जातात त्या खेरीस, श्रीविष्णूची आराधना व केशरी २८ गुरुवरांचे व्रत देखील करतात. यात श्रीविष्णूची व श्री महालक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा, श्री सूक्ताचे पठण, विष्णू सहस्त्रनामावली उपवास करावे.

Lakshami Vrat Pujan
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?
Margashirsh Mass
Margashirsh Massesakal

देवदिवाळी व्रत

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करावे. या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वांन्नांचा नैवेद्य दाखवावा. भोपळ्याचे गोड घारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य अर्पण करावा.

'श्री गुरुचरित्र सप्ताह' पारायण

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्व आहे. या सप्ताहाला 'श्री गुरुचरित्र सप्ताह' असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे.

आरोग्यसप्तमी व्रत

एकदा तरी हे व्रत अवश्य करावे. मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा. या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते.

Lakshami Vrat Pujan
Water In Dream : तुम्हाला स्वप्नात पाणी दिसतं का? जाणून घ्या अर्थ
Margashirsh Laxmi Vrat
Margashirsh Laxmi Vratesakal

लवण (मीठ) दान

मार्गशीर्ष पौर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्राच्या दिवशी चंद्रोदयाच्या समयी ब्राह्मणास लवण (मीठ) दान दिल्यास सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते.

महेश्वराष्टमी व्रत

या व्रतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कमळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला तूप, दूध यांनी स्नान घालून त्याची मनोभावे पूजा करावी. या व्रताने अश्वमेघ यज्ञ केल्याएवढे पुण्य मिळते तसेच मृत्यूपश्चात शिवलोकाची प्राप्ती होते अशी धारणा आहे.

शिवचतुर्दशी माहेश्वरी व्रत

या व्रताचे माहात्म्य नारद पुराणात सांगितले आहे. यात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेशाचे पूजन करावे. 1 ते 12 वर्षे हे व्रत केले जाते. प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य (दूध, दही, ताक, तूप, गोमूत्र) यातील एक वस्तू भक्षण करून उपवास सोडावा. या व्रतात झोपण्याची साधने दान करावी. उदा. पलंग, चादर, उशी इ. या व्रतामुळे सहस्त्र अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते.

Lakshami Vrat Pujan
Shanidev Upay: शनिवारी हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल; सुखसमृद्धी अन् धनवाढही होईल
Margashirsh
Margashirshesakal

धन्य व्रत

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा केली जाते. यात विष्णू सहस्रनामासह होमहवन केले जाते. या व्रताच्या उद्यापनावेळी लाल वस्त्र तसेच लाल फुले घेऊन विष्णू पूजन करुन दान करावे. या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते.

नामद्वादशी

मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीस नाम द्वादशी म्हणतात. या दिवशी विष्णूची पूजा करून दानधर्म करावे. या व्रतात वस्त्र, चप्पल, दान करावी.

कामिका व्रत

मार्गशीर्ष कृष्ण द्वितीय या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्री विष्णूची धातूची मूर्ती दान करावी. असे केल्याने धन- समृद्धी प्राप्त होते.

Lakshami Vrat Pujan
Astro Tips For Sleep : रोज झोपेचं खोबरं होतंय; वास्तूशास्त्रातील हे उपाय करतील शांत झोपायला मदत

वैतरणी व्रत

मार्गशीर्ष एकादशीस हे व्रत सुरु करतात. या व्रताची देवता गाय आहे. संकल्पपूर्वक गायीची पूजा करावी. गाय शक्यतो कपिला -काळी असावी. तिला स्नान घालून गंध फुले वाहून चारा-गवत द्यावे. हे व्रत पाच वर्ष करावे. या व्रताचे उद्यापन करताना संसारोपयोगी वस्तू गरजूंना दान द्याव्या. हे व्रत केल्याने पापाचा नाश होतो.

गोदान धर्मव्रत

मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हे व्रत करतात. या दिवशी उपवास करून होमहवन करावे. गाय दान केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्त होते.

प्रावरण षष्ठी व्रत

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला हे व्रत करावे. या व्रतात दान करण्याला विशेष महत्व आहे. देवाला म्हणजेच एखाद्या मंदिरात तसेच गरजवंतांना थंडीच्या निवारणासाठी लोकरीच्या वस्त्राचे दान करावे.

माहिती संकलन - वेदमूर्ती श्री. किशोर खडके गुरुजी, पुणे

Lakshami Vrat Pujan
Vivah Muhurat 2022: यंदा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लग्नासाठी हे 8 शुभ मुहूर्त; जाणून घ्या तारीख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()