Marriage Rituals : लग्नात वर-वधूला मेहंदी का लावतात माहितीये? 99% लोकांना माहिती नाही खरं कारण

वर-वधूला नेमकी मेहंदी का लावली जाते हे जवळपास 99% टक्के लोकांना अजूनही माहिती नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊया
Marriage Rituals
Marriage Ritualsesakal
Updated on

Marriage Rituals : लग्नघरात मेहंदीचा हल्ली एक खास कार्यक्रम होतो. नवरी नवरदेवाला मेहंदी लावण्याच्या कार्यक्रमात मेहंदीच्या कोणांनी आणि गुलाबाच्या फुलांनी ताट सजवण्याचा अलीकडे ट्रेंड आहे. मात्र वर-वधूला नेमकी मेहंदी का लावली जाते हे जवळपास 99% टक्के लोकांना अजूनही माहिती नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीत लग्नसोहळ्याचं विशेष महत्व आहे. भारतातील विवाह हा एका सामाजिक सणासारखा असून या सणात आप्तस्वकियांच्या साक्षीने वर-वधू लग्नबंधनात अडकतात व कायमचे एक होतात. तसेच कुटुंबियांसोबतही एक नवं नातं जुडतं.

Marriage Rituals
Marriage Rituals

लग्नाच्या या विधींपैकी एक म्हणजे मेहंदी, ज्यामध्ये वधू आणि वराच्या हातांवर आणि पायावर मेहंदी लावली जाते. लग्नात मेहंदी लावण्याची प्रथा बहुतांश राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वर-वधूच्या हातावर आणि पायावर वेगवेगळ्या डिझाइन्स काढत मेहंदी लावली जाते. हा विधी वधू आणि वराच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांद्वारे केला जातो.

का असते मेहंदीची विधी?

मेहंदी लावण्याच्या विधीला सामाजिक आणि धार्मिक महत्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूचा रंग वाढतो उजळतो

आणि तिचे सौंदर्य वाढते. हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समावेश आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवते असे म्हटले जाते. मेहंदी हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. मेहंदीच्या रंगाबाबत अशी मान्यता आहे की, मेहंदीचा रंग जेवढा गडद असेल तेवढं जास्त प्रेम जोडीदार तिच्यावर करतो. तसेच मेहंदीचा गडद रंग वरासाठी भाग भाग्यवान मानला जातो. (Wedding Ceremony)

Marriage Rituals
Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

मेहंदी लावण्याचे काही फायदे

असे मानले जाते की लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघेही खूप घाबरतात. मेहंदीचा गुणधर्म थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेहंदी लावली जाते. इतकेच नाही तर मेंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.