Masik Shivratri 2023
Masik Shivratri 2023esakal

Masik Shivratri 2023 : विवाहित जीवनात अडथळे येत असतील तर करा मासिक महाशिवरात्री व्रत

आज मासिक महाशिवरात्री आहे. तेव्हा जाणून घ्या याचे महत्व
Published on

Masik Shivratri 2023 : महाशिवरात्रीला भारतात विशेष महत्व आहे. या दिवशी बरेच लोक भक्तीभावाने पूजा आराधना करतात. तेव्हा जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्व आणि मुहूर्त.

पौष शिवरात्रीला उपवास करून भगवान शंकराची पूजा करतात.शिवरात्रीला निशिता कालच्या पूजेला महत्त्व आहे. या मुहूर्तामध्ये शिवमंत्र सिद्ध होतात, ज्यामुळे चमत्कारिक लाभ होतो. आज मासिक महाशिवरात्री आहे. तेव्हा जाणून घ्या याचे महत्व.

या दिवशी भगवान शंकराची पूजा करून पुण्य प्राप्त करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर तुम्ही या दिवशी भोलेनाथाची पूजा करून अडथळे कमी करू शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो या महिन्यात शिवरात्री कधी येते.

Masik Shivratri 2023
Mangalvar Upay : मंगळवारी चुकूनही करू नका ही 5 कामं, कुटुंबाला भोगावे लागतील गंभीर परिणाम

मासिक शिवरात्री कधी असते

हिंदू कॅलेंडरनुसार, मासिक शिवरात्री उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान शिवाची पूजा केली जाते. भगवान भोलेनाथांना समर्पित या तिथीचे शिवभक्तांसाठी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी ही तिथी भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. मासिक शिवरात्रीचे व्रत करणार्‍या व्यक्तीला भगवान शंकरासोबत माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच त्याच्या जीवनात सुख-शांती कायम राहते. (Mahashivratri)

Masik Shivratri 2023
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भांग पिण्याचा प्लान केलाय? आधी हे वाचाच

या व्रतामध्ये रात्री भोलेनाथाची पूजा केली जाते. या दिवशी महादेवाचे व्रत करणाऱ्या मुलींना जे हवे ते मिळते. या मध्यरात्री भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांनीही या दिवशी भोलेशंकरची पूजा केली.

असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मी, सरस्वती, सीता, पार्वती, रती या इतर देवींनी मोक्षासाठी उपवास आणि पूजा केली. जे लोक या दिवशी शंकराची पूजा करतात, त्यांच्यावर महादेवाची कृपा सदैव राहते. (Culture And religion)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.