Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीची व्रतकथा  महत्त्व आणि पूजा विधी...

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला ‘मोक्षदा’ तसेच ‘मोक्षदायिनी एकादशी’ साजरी केली जाते.
Mokshada Ekadashi
Mokshada EkadashiEsakal
Updated on

हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला ‘मोक्षदा’ तसेच ‘मोक्षदायिनी एकादशी’ साजरी केली जाते.

मोक्षदा एकादशी दरवर्षी मार्गशीष महिन्यातील तेजस्वी पंधरवड्याला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. 

मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच जो पूर्ण भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान विष्णूची पूजा करतो. मृत्यूनंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला. म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.

मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली, तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा-अर्चा करावी.

पंचांगानुसार, मार्गशीष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 3 डिसेंबर रोजी पहाटे 05.39 पासून सुरू होत आहे. एकादशी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी 4 डिसेंबर रोजी पहाटे 5.34 वाजता होईल. 3 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदय 06.58 वाजता होईल.शास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे महत्त्वशास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने माणसाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही एकादशी माणसाला जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्त करते, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात.

Mokshada Ekadashi
Winter Recipe : पारंपरिक पध्दतीने कवठाची चटणी कशी तयार करायची?

मोक्षदा एकादशीची व्रतकथा काय आहे? 

गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले, की त्याचे वडील नरकात गेले आहेत.दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दु:ख कथन केले. आपल्या वडिलांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही, असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकित केले. `राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.' राजाने विचारले, `गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का?' तेव्हा गुरुंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरुंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रत कथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करत़े 

Mokshada Ekadashi
Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ?

आता बघू या मोक्षदा एकादशीच्या व्रताचे नियम काय आहे?

1) मोक्षदा एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होऊन द्वादश तिथीला समाप्त होते.

2)  एकादशीच्या रात्री जागरण केले जाते आणि रात्री भगवान विष्णूचे नामस्मरण केले जाते.

3) मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवता येत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन करू नये.

4) द्वादशीला व्रताचे पारण करावे. याशिवाय द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करूनच उपवास सोडावा. 

5) जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर उपवास केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()