Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीच्या रवि योग तयार होत आहे; सुख शांती साठी करा हे उपाय

भगवान विष्णूची पूजा करताना मंत्रांचा जप केल्यास तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात असे मानले जाते.
Mokshada Ekadashi 2022
Mokshada Ekadashi 2022Esakal
Updated on

हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला ‘मोक्षदा’ तसेच ‘मोक्षदायिनी एकादशी’ साजरी केली जाते.

या वर्षी मोक्षदा एकादशीच्या दिवशी रवि योग तयार होत आहे. हिंदू कॅलेंडर आणि ज्योतिषशास्त्रात हा योग अतिशय शुभ मानला जातो. या योगात केलेल्या पूजेचे विशेष फळ मिळते. मात्र मोक्षदा एकादशीवरही भाद्रा आणि पंचकची छाया राहील. भद्राकाळ 3 डिसेंबरच्या संध्याकाळी 5:33 ते 4 डिसेंबरच्या पहाटे 5:34 पर्यंत असेल.

● विष्णूच्या मंत्रांचा जप का करावा?

मोक्षदा एकादशीचे व्रत यावर्षी 4 डिसेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना मंत्रांचा जप केल्यास तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात असे मानले जाते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीची माळ हातात घेऊन 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.

Mokshada Ekadashi 2022
Datta Jayanti 2022: दत्तजन्माची पौराणिक कथा काय आहे?

● केळीच्या झाडाची पूजा 

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यासोबतच केळीच्या झाडाची पूजा करणेही महत्त्वाचे मानले जाते. विशेषत: ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पति कमजोर असेल त्यांनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. यामुळे गुरूचे स्थान मजबूत होते आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळेही दूर होतात.

Mokshada Ekadashi 2022
Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीची व्रतकथा  महत्त्व आणि पूजा विधी...

● पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान

मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या वस्तूंचे दान अवश्य करा. याशिवाय ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे देखील लाभदायक मानले जाते. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते असी मान्यता आहे.

Mokshada Ekadashi 2022
Datta Jayanti 2022: दत्तात्रेय यांचे 52 श्लोकी गुरुचरित्र...

● गायीला चारा खायला द्यावा.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे फायदेशीर मानले जाते. तुम्हाला हे शक्य नसेल तर गोशाळेत गाईच्या चाऱ्यासाठी पैसे द्या. याशिवाय पिठाचे गोळे करून तलावातील माशांना खायला द्यावे. यामुळे जीवनातील अडचणी दूर होता असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.