Superstition : मांजर आडवी जाणं फक्त अंधविश्‍वासच नाही तर त्यामागे आहे हे कारण

अनेक लोकांची अशी अंद्धश्रद्धा आहे की मांजर आडवी आली तर अशुभ संकेत असतात. म्हणजे तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात.
Superstition
Superstitionsakal
Updated on

Superstition : भारतात अशा अनेक चुकीच्या रुढी परंपरा आणि अंधविश्वास आहे ज्यामुळे आजही अचंबित वाटतं. समाजातून अंधविश्वास दूर करुन संपुर्ण मानव समाजाला सुशिक्षित करावं, यासाठी अनेक अंद्धश्रद्धा निर्मूलन संघटना कार्य करत आहे. तरीसुद्धा काही प्रमाणात का होईन कुठे ना कुठे अंद्धश्रद्धा ही दिसून येते.

यातलीच सर्वात जास्त चर्चेत असेलेली अंद्धश्रद्धा म्हणजे मांजर आडवी आली हा अशुभ संकेत असणे त्यामुळे बरेच लोक मांजर आडवी आली की मार्ग बदलतात तर काहीजण काही पावले मागे जातात किंवा जागेवरच दोन मिनिटे थांबतात पण तुम्हाला माहिती आहे का मांजर आडवी जाणं फक्त अंधविश्‍वासच नाही तर त्यामागे एक कारणसुद्धा आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (Myth Vs Science cat superstitions is it bad luck if cat crosses your path )

मांजर आडवी जाणे - एक अंधश्रध्दा

अनेक लोकांची अशी अंधश्रध्दा आहे की मांजर आडवी आली तर अशुभ संकेत असतात. म्हणजे तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. तुम्ही कुठे जात असेल तर अडथळा येऊ शकतो, इत्यादी. पण हे खरंय का?

मुळात ही एक अंद्धश्रद्धा आहे. जी खूप काळापासून पिढ्यानी पिढ्या सुरू आहे. मांजर आडवी आल्याने काहीही होत नाही. हा फक्त लोकांचा गैरसमज आहे.

Superstition
Myth About Men : पुरुषांबाबत स्त्रीयांना कायम असे वाटते...

मांजर आडवी जाणे, अशुभ आहे ही दंतकथा कशी बनली?

पूर्वीचे लोक प्रवास करायचे तेव्हा त्यांना कधी रात्रीचाही प्रवास करावा लागायचा. एवढंच काय तर दळणवळण सुद्धा बैलगाडी, टांगा यावरुन होत असे. अनेकदा जंगलातून प्रवास करण्याचीही वेळ यायची. या दरम्यान अनेकदा जंगली प्राणी पायवाटमध्ये आडवे यायचे. त्यात अनेकदा रानमांजरही आडवी यायची.

त्यामुळे लोक थांबायचे की मांजरीच्या मागे शिकार करण्यासाठी कुणी जंगली प्राणी तर नाही ना... तेव्हापासून अशी दंतकथा बनली की, मांजर आडवी गेली तर थोडा वेळ थांबायचं, थोडे पावले मागे चालायचं आणि यातूनच मांजर आडवी गेली तर अशुभ आहे, ही अंधश्रद्धा निर्माण झाली पण मुळात ही एक अंधश्रध्दा आहे जी खरोखर दुर व्हायला हवी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही प्रकारच्या अंद्धश्रद्धेला किंवा गोष्टींना पाठिंबा देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.