Nag Panchami 2022 : जाणून घ्या पुजा कशी करावी, सापाची भीती वाटणाऱ्यांनी हा मंत्र म्हणावा
पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. महाराष्ट्रासह संपुर्ण देशात नागपंचमी हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रत्यक्ष नागाचे पुजन केले जाते तर काही ठिकाणी लोक आपल्या घरी नागाचे चित्र काढून नागपंचमीचे पुजन करतात. नेमके नागपंचमीला नागाचे पुजन का आणि कसे केले जाते हे आपण जाणून घेवूया. (Latest Marathi News)
नागपंचमीचे महत्वे
श्रावण महिना हा देवांचे देव महादेव यांचा महिना म्हणून मानला जातो. या महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक- भक्तांकडून भगवान शंकराची आराधना, पुजा, यज्ञ- यागादी कर्म केले जातात. आपण जेव्हाही भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनाला जातो, मग ते मुर्ती स्वरुप असेल किंवा शिवलींग असेल तेथे आपल्याला नागाचे दर्शन होते. भगवान शंकराला प्रसन्न करताना नाग पुजेचे महत्व पुरांणांमध्ये सांगितले आहे. मात्र या सोबतच सर्वसामान्यांच्या मनात नागाबद्दल (सर्प) आदर आणि पूज्य भावना रुजविण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वेदकाळापासून हा सण चालत आला असून हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी घराघरामध्ये गोड पदार्थ तयार केले जातात.
नागपुजेचे असेही महत्व
विषारी साप किंवा बिनविषारी साप आपणहून कोणालाच उपद्रव निर्माण करत नहीच पण मानवी उपद्रव ठरणाऱ्या उंदिर घुशीचा फडशा पाडतो. ही नैसर्गिक वास्तविकता मानवी मनावर ठासावी, या उद्देशाने नागपंचमी करतात सण साजरा केला जातो.
अशी आहे आख्यायिका...
श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमी हे व्रत केले जाते. श्री कृष्णाकडून कालियामर्दन झाला तो दिवस म्हणजे नागपंचमी अशी पूर्वापार परंपरा आहे. कालियासारख्य प्रचंड नागाचा महापराभवदीन नागपूजा करुन सजरा करतात. त्यामुळे कालियामर्दनाचे चित्र नागपंचमीदिविशी पूजतात.
असे करावे नागपंचमीचे पुजन...
पूर्वापार काळापासून नागपंचमीला घरोघरी नवनाग पूजन केले जात असे. या दिवशी एका कागदावर शाईने किंवा पाटावर गंधाने नवनागयंत्र किंवा नवनागांचे चित्र काढावे. या शिवाय आपल्या कुटूंबातील प्रथा परंपरेनुसार प्रथम घराच्या भिंतीवर गंधाने नागाचे चित्र काढून नागपूजा करावी. आपण रेखाटलेल्या नागयंत्राला पाणी, दुध यांनी अभिषेक करुन त्यावर गंध अक्षत- पुष्प वाहावे. नागदेवाला पुजा झाल्यावर दुध, लाह्या यांचा नैवेद्य अर्पण करावा. यावेळी खालील मंत्र म्हणावा.
अनंत वासुकि शेषम् पद्मनाभं चं कम्बलम्।
शंड्खपाल धृतराष्ट्र तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च् महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः।।
तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत्।।
ज्यांना सापांचे भय वाटत असेल अशा व्यक्तिंनी या मंत्राचा दररोज शक्य तितका जप करावा.
या नंतर देवाला प्रार्थना करावी.
‘श्रावण शुक्ल पंचम्यांम यत् कृतं नागपूजनं । तेन तृप्यती मे नागा भवन्तु सुखदा सदा । इति नवनाग महात्मनम सायंकाळे पठेन्नित्यम् नागा भवन्तु सुखदा इन तेन त्रिप्यन्तुः सदा । अज्ञान ते वापि यान्मय पूजा कृतम् । नूनातिरक्तं तत्सर्वं भो नागाह क्षन्तुमरथः । युष्मत्प्रसादतस्कला मम सन्तु मनोरथः । सदा मतकुले मस्तु भयं सर्पविषोद्भवम् । ओम नागदेवता नमो नमः ।।
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.