Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी चिरणे, तळणे, भाजणे या गोष्टी टाळण्यामागे मूळ कारण काय आहे? 

वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात.
Nagpanchami
NagpanchamiEsakal
Updated on

दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात. धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलले आहे, तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती, त्यामुळे समुद्रमंथन झाले, त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहीन देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला.

यंदा हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 12:21 वाजता सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी पहाटे 02:00 वाजता समाप्त होईल. सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी सोमवारी, 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

Nagpanchami
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

नागपंचमीसंदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांतीस्थाने असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये, म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते. त्यादिवशी जशी शेतकामाला सुटी तशीच गृहीणीलाही रोजच्या रांधा, वाढा, उष्टी काढा या कामातून सुटी देण्याच्या हेतूने भाजू, चिरू नये असा नियम केला असावा. ती स्वत:साठी सुटी कधीच घेत नाही, अशा निमित्ताने तिला थोडा आराम, हा त्यामागील मूळ हेतू आहे. 

Nagpanchami
Ranbhaji Recipe : पाथरीची सुकी भाजी कशी तयार करायची?

त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची. ती कथा पुढीलप्रमाणे आहे.एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असतना त्याच्या नांगराचा  फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वत: ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले. त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली. 

Nagpanchami
Nag Panchami 2023 : यंदा नागपंचमी कधी आहे ? जाणून घेऊ या पूजेचे महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी

या कथांवरून कळते, की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते. यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इ. कामे टाळली जातात. तरीदेखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड , पातोळ्या यांसारखे पदार्थ त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.गावातच नाही, तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते, परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता, त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाजजागृती झाली आहे. यानिमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्याखुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले, तर या सणाचा व्यापक दृष्टीकोन सार्थकी लागू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.